फुले चित्रपट टॅक्स फ्री करावा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी

फुले चित्रपट टॅक्स फ्री करावा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील ‘फुले’ सिनेमा सेंसॉरच्या कचाट्यातून सुटल्यानंतर रिलीज झाला आहे. हा एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारक सिनेमा आहे. देशभरात नव्या पिढीला महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची माहिती मिळणे आवश्यक आहे.जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या क्रांतीचा इतिहास नव्या पिढीला समजला पाहिजे. त्यासाठी फुले चित्रपट हा देशभरात टॅक्स फ्री झाला पाहिजे अशी आपली मागणी असून त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले

अंधेरी येथे रामदास आठवले यांच्या साठी फुले सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग करण्यात आले. फुले चित्रपट पाहिल्यानंतर रामदास आठवले यांनी हा चित्रपट देशभरात पोहोचला पाहिजे. त्यासाठी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित व्हावा आणि फुले या चित्रपटाला करमुक्त करावे अशी आपली मागणी असून त्या बाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.यावेळी फुले चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन आणि निर्माते रितेश कुडेचा रिपाइंचे शैलेशभाई शुक्ला, सिद्धार्थ कासारे, जतीन भुट्टा, प्रकाश जाधव आदी उपस्थित होते.

 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी शो दाखवा

महात्मा फुले यांच्या जीवनावरील फुले हा सिनेमा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती भवनात दाखवण्यात यावा अशी विनंती दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी रामदास आठवले यांना केली. त्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन रामदास आठवले यांनी दिले. फुले सिनेमा सर्व सिनेमागृहात दाखवण्यात यावा. सर्वांनी फुले सिनेमा जरूर पाहावा असे आवाहनही रामदास आठवले यांनी यावेळी केले.
फुले चित्रपटात प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांनी मुख्य भूमिका केलेली आहे. फुले सिनेमामध्ये महात्मा फुले यांचे जीवनकार्य त्यांचे क्रांतिकारी योगदान अत्यंत उत्कृष्टपणे दाखवण्यात आले आहे असे कौतुक रामदास आठवले यांनी केले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी कुख्यात गुन्हेगाराला भरवला केक! विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी कुख्यात गुन्हेगाराला भरवला केक!
‘विधानसभा उपाध्यक्षपदावर असल्याने आता व्यवस्थित वागले पाहिजे,’ या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सल्ल्याला अण्णा बनसोडे यांनी केराची टोपली दाखविल्याचे समोर...
Pahalgam Terror Attack पहलगामचा बदला कधी? दिल्ली आणि इस्लामाबादेत सध्या बैठकांवर जोर
एजाज खानला पाठवणार समन्स
देशभरात उद्या मॉकड्रील, ब्लॅकआऊट होणार… युद्धाचा सायरन वाजणार
एक साडेचार फुटांचा मंत्री…वडेट्टीवार यांचा नितेश राणेंना टोला
गणरायाच्या पीओपी मूर्तींवर सरकार प्रसन्न! राज्याच्या अहवालावर भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाचे प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश…
नीट काम करा नाहीतर तुमची जागा रोबो घेईल, अजितदादांनी कर्मचाऱ्यांना झापले