लग्नानंतर ऋषी कपूर यांचे अनेक महिलांसोबत ‘वन नाईट स्टँड…’, नीतू कपूर यांच्याकडून मोठा खुलासा
अभिनेता ऋषी कपूर यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही त्यांचे अनेक सिनेमा चाहते तितक्याच आवडीने पाहातात. एक काळ असा होता जेव्हा ऋषी कपूर फक्त त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत होते. अनेक अभिनेत्रींसोबत त्यांच्या नावाची चर्चा झाली. अखरे नीतू कपूर यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर ऋषी कपूर यांच्या सर्व रिलेशनशिपच्या चर्चांना पूर्णविराम लागला. नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांच्या लग्नाचे फोटो आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
लग्नानंतर देखील ऋषी कपूर इतर महिलांसोबत फ्लर्ट करायचे याचा खुलासा खुद्द नीतू कपूर यांनी एका मुलाखतीतून केला. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. एवढंच नाही तर, पुरुषांना त्यांची स्पेस द्यायला हवी असं देखील नीतू कपूर म्हणाल्या होत्या.
नीतू कपूर पतीच्या अफेअरबद्दल म्हणाल्या, ‘ऋषी कपूर यांच्या अफेअरबद्दल मला माहिती होती. अनेक महिलांसोबत फ्लर्ट करताना मी त्यांना पाहिलं आहे. त्याचे अनेक अफेअर होते. पण ते फक्त वन नाईट स्टँड होते… अनेक जण मला त्यांच्या अफेअरबद्दल सांगायचे.. सुरुवातीला मला वाईट वायाटचं.
‘त्यांच्या वन नाईट स्टँड मी कंटाळी होती. पण ते माझ्या शिवाय राहू शकत नव्हते हे देखील मला माहिती होतं. त्यामुळे मी देखील विचार करणं सोडून दिलं होतं. पुरुषांना थोडं स्वातंत्र द्यायला हवं. कारण काही गोष्टी त्यांच्या स्वभावात असतात. पण अन्य महिलेसोबत त्यांचं नातं फार पुढे गेलं असतं तर, मी त्यांना घराबाहेर काढलं असते.’ असं देखील नीतू कपूर म्हणाल्या..
सांगायचं झालं तर नीतू कपूर यांनी शेवटपर्यंत पती ऋषी कपूर यांची साथ दिली. ऋषी कपूर यांचं 2020 मध्ये निधन झालं. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली होती. आजही ऋषी कपूर यांच्या आठवणीत फोटो आणि व्हिडीओ नीतू कपूर सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.
ऋषी कपूर यांच्या जाण्यांनी नीतू कपूर यांच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली. पतीच्या निधनानंतर नीतू कपूर यांनी पुन्हा बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री केली आहे. आज नीतू कपूर त्यांच्या मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहेत. ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांना दोन मुलं आहे. रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर असं त्यांच्या दोन मुलांची नावे आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List