Raw Mango Benefits- कैरी खाण्याचे हे आहेत 7 आरोग्यदायी फायदे!

Raw Mango Benefits- कैरी खाण्याचे हे आहेत 7 आरोग्यदायी फायदे!

उन्हाळ्यात बाजारात कच्ची कैरी पाहिल्यावर मन अगदी बालपणात रमते. आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधीतरी आंब्याच्या झाडावर दगड मारुन कैरी पाडली असलेच. आंब्याच्या झाडाशी लहानपणापासून नातं जुळलेलं असतं. कैरी ही कच्ची कैरी ही आरोग्यासाठी फार उत्तम मानली जाते. म्हणूनच कैरी बाजारात दिसू लागल्यावर, कैरी पन्हे, कैरीची चटणी, कैरीचे लोणचे असे विविध पदार्थ घरोघरी होऊ लागतात.

कैरीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई व्यतिरिक्त कॅल्शियम, फॉस्फरस आणि फायबरसारखे पोषक घटक आढळतात. यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात. केवळ इतकेच नाही तर, कैरी ही काळ्या मीठासोबत खाल्ल्यास, पचनक्रिया चांगली होण्यास मदत होते.

कच्ची कैरी खाण्याचे फायदे

 

कच्च्या कैरीत व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

 

मधुमेहाचे रुग्ण असाल तर, कच्ची कैरी खाणे हे अतिशय फायदेशीर आहे. मधुमेही आहारात कच्ची कैरी समाविष्ट करुन, साखरेची पातळी नियंत्रित ठेवु शकतात.

गॅस, बद्धकोष्ठता आणि अ‍ॅसिडिटीच्या समस्येत कैरी ही खूप महत्त्वाची मानली जाते. कैरी खाण्यामुळे आपल्या पोटाच्या समस्या नाहीशा व्हायला मदत होते.

 

कैरीमुळे आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मोठी मदत होते. तसेच रक्ताभिसरण योग्य होण्यास मदत होते.

कैरीमध्ये असलेल्या कॅरोटीनाॅइडमुळे डोळ्यांचे आजार होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते.

 

कैरी ही त्वचेसाठी सुद्धा खूप उत्तम मानली जाते. कैरीमध्ये असलेले व्हिटॅमिन ए त्वचेचे आरोग्य सुधारण्यास खूप मदत करते.

 

कैरीत खूप कमी कॅलरीज असल्यामुळे कैरीमुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘सर्जिकल स्ट्राईक नको, आता थेट सर्जरीच…’, पहलगाम हल्ल्यावर भुजबळ काय म्हणाले? ‘सर्जिकल स्ट्राईक नको, आता थेट सर्जरीच…’, पहलगाम हल्ल्यावर भुजबळ काय म्हणाले?
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. भारतानं घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर आता पाकिस्तानवर चांगलाच दबाव वाढला आहे....
WAVES 2025: 10 व्या चित्रपटानंतर अल्लू अर्जुनचा मोठा अपघात, 6 महिने घरात बसण्याचा सल्ला पण..
Javed Akhtar : आता आर नाही तर पार… लक्षात राहील असं उत्तर द्या,अद्दल घडवा ! पहलगाम हल्ल्यानंतर संतप्त जावेद अख्तर यांची सरकारकडे मागणी
कलिंगड खरेदी करताना या ‘पाच’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर तुमचे आरोग्य येऊ शकते धोक्यात!
‘पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना शहीदांचा दर्जा द्यावा, राहुल गांधींची पंतप्रधान मोदींकडे मागणी
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद झाल्याने एअर इंडियाला बसणार फटका; होणार कोट्यवधींचं नुकसान
Ratnagiri News – ‘टॉवर लावलाय नावाला अन् रेंज नाही गावाला’, BSNL च्या भोंगळ कारभाराने गावकरी त्रस्त