कुणाल कामराला अटक करण्याची आवश्यकता नाही, हायकोर्टाकडून दिलासा; निकाल राखून ठेवला

कुणाल कामराला अटक करण्याची आवश्यकता नाही, हायकोर्टाकडून दिलासा; निकाल राखून ठेवला

‘गद्दार’ गीताद्वारे मिंधे गटाच्या कृत्यांची चिरफाड करणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला मुंबई उच्च न्यायालयाकडून आज अंतरिम दिलासा मिळाला. जबाब नोंदवण्यासाठी कुणालला अटक करण्याची आवश्यकता नाही, त्याचा जबाब तामिळनाडूमध्ये जाऊन नोंदवू शकत नाही का, असा  सवाल करत हायकोर्टाने कुणालवर सूड उगवण्यापासून सरकारला तूर्तास रोखले. निकाल जाहीर करेपर्यंत कुणालविरोधात कारवाई करू नका, असे बजावत न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने याचिकेवरील निकाल राखून ठेवला.

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने गायलेले  विडंबनात्मक ‘गद्दार’ गीत मिंधे गटाला चांगलेच झोंबल्याने मिंध्यांकडून कुणालला धमक्या दिल्या जात आहेत. या प्रकरणी आकसापोटी मिंध्याच्या कार्यकर्त्यांनी कुणालविरोधात चार गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे रद्द करण्यात यावेत तसेच धमक्यांच्या पार्श्वभूमीवर कारवाईपासून तातडीने दिलासा देण्यात यावा, अशी मागणी करत कुणाल कामरा याने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज बुधवारी न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी राज्य सरकारच्या वतीने अॅड. हितेन वेनेगावकर यांनी युक्तिवाद केला, तर कुणाल कामराच्या वतीने ज्येष्ठ वकील नवरोज सिरवई यांनी युक्तिवाद केला.

अजितदादाही मिंध्याना गद्दार म्हणाले

ज्येष्ठ काwन्सिल नवरोज सिरवाई यांनी युक्तिवाद करताना खंडपीठाला सांगितले की, सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील शिंदे यांना ‘गद्दार’ म्हणून संबोधले होते. तरीही मिंध्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याबाबत कोणतीही तक्रार किंवा कारवाई केली नाही, मात्र कुणालविरोधात हेतुपुरस्सर व जाणूनबुजून एफआयआर नोंदवण्यात आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;