अपंगांसाठी केवायसी प्रक्रिया सुलभ करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, जगण्याच्या अधिकाराचा नव्याने अर्थ लावण्याची गरज

अपंगांसाठी केवायसी प्रक्रिया सुलभ करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, जगण्याच्या अधिकाराचा नव्याने अर्थ लावण्याची गरज

बँकिंग सेवा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ घेता यावा याकरिता अपंग आणि ऑसिड हल्ल्यातील पीडितांसाठी केवायसी (नो युवर कस्टमर) प्रक्रिया सुलभ करण्याचे निर्देश बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्याचबरोबर सध्याच्या काळात डिजिटल प्लॅटफॉर्मचे लोकांच्या आयुष्यात वाढलेले महत्त्व पाहता जगण्याच्या अधिकाराचा नव्याने अर्थ लावण्याची गरज न्यायालयाने अधोरेखित केली.
डिजिटल केवायसीमुळे पडताळणी प्रक्रिया जलद आणि अधिक कार्यक्षम होऊन सर्वसामान्यांना फायदा झाला आहे. मात्र अंध आणि कमी दृष्टी असलेल्या व्यक्तींना याचा लाभ घेता येत नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि आर महादेवन यांच्या खंडपीठाने पेंद्राला आणि संबंधित विभागांना केवायसी प्रक्रिया सर्वसमावेशक आणि अपंगांकरिता सुलभ व्हावी याकरिता 20 महत्त्वपूर्ण निर्देश दिले.
वापरण्यास सोप्या वेबसाईट्स, ऑप्लिकेशन्स आणि सहाय्यक तंत्रज्ञानाच्या अभावामुळे अपंग व्यक्तींना ऑनलाईन सेवा मिळविताना अनेक अडचणी येतात. यामुळे घटनेच्या कलम 21 अंतर्गत असलेल्या राज्याच्या जबाबदाऱयांचाही विस्तार व्हायला हवा. यात डिजिटल पायाभूत सुविधा, सरकारी पोर्टल, ऑनलाईन लार्ंनग प्लॅटफॉर्म आणि वित्तीय तंत्रज्ञान हे सुलभ, समावेशक कसे राहील, याची जबाबदारी राज्यांवर (सरकारवर) राहील. जेणेकरून सर्व उपेक्षितांच्या गरजा यामुळे पूर्ण होऊ शकतील, अशी सूचना न्यायालयाने निकाल देताना केली आहे.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;