बेस्ट दरवाढ पुढील आठवडय़ापासून, बेस्ट आणि रिजनल ट्राफिक अॅथोरेटीची झाली बैठक
बेस्ट बसच्या दरात दुपटीने वाढ करण्यासाठी मुंबई महापालिकेने मंजुरी दिली असताना आज मंत्रालयात रिजनल ट्राफिक अॅथोरेटी आणि बेस्ट उपक्रमात बैठक झाली. बैठकीत रिजनल ट्राफिक अॅथोरेटी तिकीट दरवाढीबाबत सकारात्मक असून चर्चेतील मसुदा बनवण्यात आल्यानंतर या दरवाढीवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. त्यासाठी आणखी दोन दिवस लागणार असल्यामुळे पुढील आठवडय़ातच बेस्ट दरवाढीचा निर्णय जाहीर केला जाणार आहे.
मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्टच्या दरात दुपटीने वाढ करण्याला मुंबई महापालिकेने मंजुरी दिल्याचे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी रिजनल ट्राफिक अॅथोरेटीकडे हा प्रस्ताव पाठवला जाणार होता. त्यानुसार आज मंत्रालयात रिजनल ट्राफिक अॅथोरेटी आणि बेस्ट उपक्रमाची बैठक पार पडली. या बैठकीत बेस्ट बसेसच्या तिकीट दरात वाढ करण्यावर सकारात्मक चर्चा झाली. परंतु झालेल्या चर्चेचा तपशीलवार मसुदा बनवण्यासाठी एक ते दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे अॅथोरेटीने तिकीट दरवाढीच्या प्रस्तावावर तात्काळ स्वाक्षरी केली नाही. पुढील एक ते दोन दिवसांत चर्चेचा मसुदा तयार झाल्यानंतर रिजनल ट्राफिक अॅथोरेटीची बेस्ट बस तिकीट दर वाढीच्या प्रस्तावावर स्वाक्षरी होणार असल्याचे सांगण्यात आले.
उर्वरित महत्त्वाची कामे पूर्ण करणार
रिजनल ट्राफिक अॅथोरेटीची स्वाक्षरी झाल्यानंतरही तिकीट मशीनमध्ये काहीसा बदल करणे, संगणक अपडेट करणे बाकी आहे. त्यामुळे सोमवारी किंवा मंगळवारी तिकीट दरवाढ जाहीर करणार असल्याची शक्यता आहे. या बैठकीदरम्यान, रिक्षा, टॅक्सीच्या मीटर रिपॅलिब्रेशनसाठीदेखील महिनाभराची मुदतवाढ देण्यात आल्याचे समजते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List