निवडक वेचक – छत्तीसगडमध्ये चार नक्षल्यांना पकडले
सुकमा : सुरक्षा दलांनी बिजापूर जिह्यात नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेली 10 किलो स्पह्टके ताब्यात घेतली तसेच माओवादी संघटनांच्या चार नक्षलवाद्यांना अटक केली. यापैकी एका नक्षलवाद्यावर 2 लाखांचे बक्षीस होते, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
व्हेल शार्कला वाचवा; 75 हजार बक्षीस मिळवा
पणजी : धोक्यात असलेल्या व्हेल शार्क या समुद्री जिवांना वाचवणाऱया तसेच त्यांची सुटका करणाऱ्यांना 75 हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा गोवा सरकारने केली आहे. आंतरराष्ट्रीय शार्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्र्यांनी याबाबतची घोषणा केली.
जम्मू–कश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना अटक
जम्मू : पोलिसांनी जम्मू आणि कश्मीर सीमेवरील पुँछ जिह्यातून दोन सशस्त्र दहशतवाद्यांना अटक केली. आझमगड येथील तारीख शेख आणि चंबर गावातील रियाझ अहमद अशी या दोन दहशतवाद्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन रायफल्स जप्त करण्यात आल्या.
इथेनॉलमिश्रित पेट्रोल;सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल टाकले जात आहे. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. योग्य नसलेले इंधन वापरण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप आहे.
सीआयएसएफ कर्मचाऱ्यांना कमी व्याज दरात कर्ज
नवी दिल्ली : सीआयएसएफ अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना आता कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या जवानांना आता वैयक्तिक गरजांसाठी देण्यात येणारे कर्ज पाच लाख रुपये करण्यात आले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List