24 तासांत मुंबईतून सहा अल्पवयीन मुलं आणि मुली बेपत्ता, पोलिसांकडून शोध सुरू
24 तासांत मुंबईतून तीन अल्पवयीन मुले आणि तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाले असून, त्यांचे वय 12 ते 17 वर्षे दरम्यान आहे. 27 ते 28 ऑगस्टदरम्यान हे सहा जण गायब झाल्याची माहिती अधिकार्यांनी रविवारी दिली.
या अचानक बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे पालक आणि पोलीस दोघेही गंभीर चिंतेत आहेत. या प्रकरणी शिवाजी नगर, मालाड, कुरार आणि घाटकोपर पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरणाचे गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.
आतापर्यंत कोणत्याही खंडणीच्या मागणीचे कॉल आलेले नाहीत. मात्र, अधिकार्यांनी सांगितले की सर्व शक्यता तपासल्या जात आहेत, त्यात काही मुलांनी पळून जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
या मुलांना शोधण्यासाठी पोलिसांनी बेपत्ता मुलांची छायाचित्रे शहरातील गर्दीच्या ठिकाणी रेल्वे स्थानके, बस डेपो, रुग्णालये आणि इतर सार्वजनिक ठिकाणी प्रसारित केली आहेत. सर्व पोलिस ठाण्यांमध्ये विशेष ‘मिसिंग स्क्वॉड’ सक्रिय करण्यात आले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List