स्मार्ट मीटर तक्रारींचा ढीग महावितरणच्या तोंडावर मारणार, शिवसेनेची मोहीम सुरू

स्मार्ट मीटर तक्रारींचा ढीग महावितरणच्या तोंडावर मारणार, शिवसेनेची मोहीम सुरू

महावितरणच्या स्मार्ट मीटरला ग्राहकांचा विरोध असतानाही ते मीटर टिओडी या गोंडस नावाने वीज ग्राहकांच्या माथी मारले जात आहेत. या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. स्मार्ट मीटरच्या विरोधात असलेल्या तक्रारींचा ढीग महावितरणच्या तोंडावर मारून स्मार्ट मीटरला विरोध नाही म्हणणाऱ्या महावितरणची झोप शिवसैनिक उडवणार आहेत. आजपासून स्मार्ट मीटरच्या तक्रारी गोळा करण्याची मोहीम शिवसेनेने सुरू केली आहे.

महावितरणच्या स्मार्ट मीटर संदर्भात आज शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते माजी आमदार बाळ माने यांनी मार्गदर्शन केले.माजी आमदार बाळ माने यांनी सांगितले की, स्मार्ट मीटर बाबत आपण एक अर्ज तयार केला आहे.तो अर्ज तक्रारदार वीज ग्राहकांकडून भरून घ्यायचा आहे. कोणत्याही परिस्थितीत हे अदानीचे स्मार्ट मीटर आपल्याला बंद करायचे आहेत. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत सांळुखे, शहरसंघटक प्रसाद सावंत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

१० हजार तक्रार अर्ज सादर करणार

स्मार्ट मीटर बाबत पहिल्या टप्प्यात पाच हजार तक्रार अर्ज भरून घ्यायचे आहेत. स्मार्ट मीटरमुळे प्रचंड वीज बील आल्याने ग्राहक संतापले आहेत.आपण त्यांच्या तक्रारी नोंदवून घेऊ. दुसऱ्या टप्प्यात पाच हजार अर्ज भरून या सर्व तक्रारी महावितरणच्या कार्यालयात सादर करू असे माजी आमदार बाळ माने यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नेपाळची सत्ता हाती घेताच सुशीला कार्की ॲक्शन मोडवर, माजी पंतप्रधान केपी शर्मा ओलींविरुद्ध FIR केली दाखल नेपाळची सत्ता हाती घेताच सुशीला कार्की ॲक्शन मोडवर, माजी पंतप्रधान केपी शर्मा ओलींविरुद्ध FIR केली दाखल
नेपालमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावर बंदीविरोधात तरुणांनी ८ सप्टेंबर रोजी सुरू केलेल्या आंदोलनाने राजकीय भूकंप घडवून आणला आहे. या सहा...
Kokan News- मोबाईल नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांची परीक्षा थेट झाडावरच्या मचाणावर !
स्मार्ट मीटर तक्रारींचा ढीग महावितरणच्या तोंडावर मारणार, शिवसेनेची मोहीम सुरू
चीनवर 100 टक्के टॅरिफ लावा, ट्रम्प यांचं NATO देशांना पत्राद्वारे आवाहन
जामीन-अटकपूर्व जामीन याचिका दोन महिन्यांत निकाली काढाव्यात, सर्वोच्च न्यायालयाचे उच्च आणि कनिष्ठ न्यायालयांना निर्देश
BCCI पहलगाममधील 26 जणांची निर्घृण हत्या विसरली; हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर कुंकू गमावणाऱ्या पीडितेचा संताप
दोन वर्षांत 46 विदेश दौरे, पण मणिपुरात एकही नाही… कुठे आहे तुमचा राजधर्म? खरेगेंचा पंतप्रधान मोदींना थेट सवाल