UN मध्ये हिंदुस्थानचा ‘पॅलेस्टिन’ला स्वतंत्र राष्ट्र करण्याच्या ठरावाला पाठिंबा; अमेरिका, इस्रायलचा तीव्र विरोध
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यातील शांततापूर्ण तोडगा आणि द्वि-राज्य उपायासाठी न्यूयॉर्क घोषणापत्राला पाठिंबा देणाऱ्या ठरावाच्या बाजूने हिंदुस्थानने मतदान केले. फ्रान्सने मांडलेल्या या ठरावाला १४२ देशांनी समर्थन दिले, तर इस्रायल, अमेरिका, अर्जेंटिना, हंगेरीसह फक्त ९ देशांनी विरोध केला.
या घोषणापत्रात इस्रायली नेतृत्वाला दोन-राज्य उपायांवर स्पष्टता व्यक्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यात इस्रायलने पॅलेस्टिनींविरुद्ध हिंसाचार तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. याशिवाय पूर्व जेरुसलेमसह व्यापलेल्या पॅलेस्टिनी भूभागात सर्व प्रकारच्या वसाहती, जमीन संपादन आणि विलयीकरणाच्या कारवाई तात्काळ थांबवावे आणि वसाहतवाद्यांना होणारा हिंसाचार थांबवावा, अशी मागणी केली आहे.
संयुक्त राष्ट्रांमध्ये हिंदुस्थानने दिलेल्या मतदानामुळे गाझावरील पूर्वीच्या भूमिकेतून स्पष्ट बदल झाला आहे, असे दिसून येत आहे. याआधी गाझामध्ये युद्धबंदीचे आवाहन करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सभेच्या ठरावातून हिंदुस्थानने गेल्या तीन वर्षांत चार वेळा स्वतःला वेगळे ठेवले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List