नेपाळची सत्ता हाती घेताच सुशीला कार्की ॲक्शन मोडवर, माजी पंतप्रधान केपी शर्मा ओलींविरुद्ध FIR केली दाखल
नेपालमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावर बंदीविरोधात तरुणांनी ८ सप्टेंबर रोजी सुरू केलेल्या आंदोलनाने राजकीय भूकंप घडवून आणला आहे. या सहा दिवसांच्या हिंसक आंदोलनात ५१ जणांचा मृत्यू झाला असून, १,५०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. यातच माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी ९ सप्टेंबर रोजी दबावाखाली पद सोडले. यानंतर देशाच्या पहिल्या महिला अंतरिम पंतप्रधान सुशीला कार्की यांनी सत्ता हाती घेतली असून त्यांनी पहिला मोठा निर्णय घेत माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
केपी शर्मा ओली यांच्याविरोधात काठमांडू येथे एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर आरोप आहे की, ओलींनी आंदोलकांवर पोलिसांना अतिरेकी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सध्या ओली यांनी देशातून पलायन केलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List