चीनवर 100 टक्के टॅरिफ लावा, ट्रम्प यांचं NATO देशांना पत्राद्वारे आवाहन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो देशांना चीनवर ५० ते १०० टक्के टॅरिफ लावण्याचे आवाहन केले आहे. या उपायामुळे चीनची रशियावरची आर्थिक पकड कमकुवत होईल आणि रशिया-युक्रेन युद्ध शांततापूर्ण समाप्त होईल, असा ट्रम्प यांचा दावा आहे. हिंदुस्थानवर गेल्या महिन्यात २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लावल्यानंतर आता चीनही ट्रम्प यांच्या निशाण्यावर आला आहे. नाटो देशांना पाठवलेल्या पत्रात ट्रम्प यांनी रशियावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लावण्याची आणि रशियन तेलाची खरेदी थांबवण्याची मागणी केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे, “मी रशियावर मोठे निर्बंध लावण्यास तयार आहे, पण सर्व नाटो देश एकत्र येऊनच असा निर्णय घेतील तेव्हाच.” यामध्ये त्यांनी नाटो देशांना चीन आणि इतर देशांच्या कंपन्यांसोबत सहकार्यावर निर्बंध घालण्याचे आवाहन केले आहे. या उपायांमुळे रशियाची अर्थव्यवस्था कमकुवत होईल आणि युक्रेन युद्ध संपण्याची शक्यता वाढेल, असा ट्रम्प यांचा विश्वास आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List