गोरेगावच्या चित्रनगरीत छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य आणि पराक्रमाची गाथा सांगणारा देखावा यंदा गोरेगावच्या ‘चित्रनगरी’ने साकारला आहे. जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झालेल्या किल्ल्यांचा आकर्षक देखावा भाविकांचे आकर्षण ठरत आहे.
गोरेगावमधील दादासाहेब फाळके चित्रनगरीत विराजमान झालेल्या श्री गणरायाचे यंदा 32 वे वर्ष आहे. चित्रनगरीच्या गणेशोत्सवात महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग,
सिंधुदुर्ग या 11 आणि तामीळनाडूच्या जिंजी किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती उभारण्यात आली आहे. त्याचबरोबर या किल्ल्यांच्या पराक्रमाची माहिती देण्यात आली आहे. छत्रपती शिवरायांचा पराक्रम, त्यांची मूल्ये आणि त्यांच्या पर्यावरण प्रेमाची महती जनसामान्यांना समजावी, या दृष्टिकोनातून देखाव्यांना नाविन्यतेची जोड देण्यात आली आहे. कलादिग्दर्शक सुमित पाटील यांनी हा देखावा साकारला आहे. छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेतील तपशील शाळकरी मुले व जनसामान्यांना सहजगत्या समजावा, यासाठी बोलीभाषेत राजमुद्रा मांडण्यात आली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List