Ratnagiri News – प्रेमसंबंधातून तरूणीचा आंबा घाटात खून, मृतदेहाचा शोध सुरू

Ratnagiri News – प्रेमसंबंधातून तरूणीचा आंबा घाटात खून, मृतदेहाचा शोध सुरू

प्रेमसंबंधातून रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथील तरुणीचा तिच्या प्रियकराने आंबा घाटात खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या तरुणीच्या शोधादरम्यान हा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून आंबा घाटात मृतदेहाचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय तरुणी 10 दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला असता, त्यांना तरुणी आणि खंडाळा येथील एका तरूणाचे प्रेम संबंध असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने संशयित तरुणाला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, पण कठोर चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे माहिती समोर आली आहे. स्थानिक पोलीस आणि गुन्हे अन्वेषण पथकाने तात्काळ आंबा घाटाकडे धाव घेतली आहे. आंबा घाटात मृतदेहाचा शोध सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ratnagiri News – आरवलीजवळ मिनी बसची कारला टक्कर, 4 जण जखमी Ratnagiri News – आरवलीजवळ मिनी बसची कारला टक्कर, 4 जण जखमी
मुंबई गोवा महामार्गावर आरवलीजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या मिनी बसने एका कारला धडक दिल्याने दोन महिलांसह दोन मुली जखमी झाल्या. मिनी...
Maratha Reservation : कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन आरक्षण दिल्यास ते टिकणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Maratha Reservation Protest : मुंबईतून एकतर विजय यात्रा जाईल किंवा माझी अंत्ययात्रा – मनोज जरांगे पाटील
उच्च रक्तदाबासोबत लिव्हर डॅमेजची 5 लक्षणं आढळली, तर जराही दुर्लक्ष करु नका
पुरुषांसाठी खतरनाक आहेत हे खाद्यपदार्थ, जादा सेवनाने स्पर्म काऊंट घटते, अहवालात खुलासा
PHOTO – दगडूशेठ हलवाई गणपतीने मंडळाने साकारली पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती
मराठा आरक्षणाची कोंडी सोडवण्यासाठी सरकार चर्चेला का येत नाही? अंबादास दानवे यांचा सवाल