आयपीएल थकवणारा ठरत होता म्हणून निवृत्त झालो, अश्विनच्या निवृत्तीमागचे रहस्य उलगडले
हिंदुस्थानचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. आयपीएलचे तीन महिने माझ्यासाठी अतिशय थकवणारे ठरत होते. पुढील हंगाम खेळू शकेन की नाही, याचा विचार मी करत होतो. जसजसे वय वाढते तसतसे खेळण्याची क्षमता कमी होत जाते. मात्र महेंद्रसिंग धोनी अपवाद आहे, त्याला पाहून मी थक्क होतो, अशा शब्दांत अश्विनने निवृत्तीमागचे कारण स्पष्ट केले.
अश्विनने 27 ऑगस्ट रोजी आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली होती. यापूर्वी तो आयपीएल 2025 हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता. मात्र, शेवटच्या हंगामात त्याचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. सीएसकेकडून खेळलेल्या नऊ सामन्यांमध्ये त्याने केवळ सात विकेट घेतले.
यूटय़ूब चॅनेलवर बोलताना अश्विन म्हणाला, आयपीएल क्रिकेटपटू म्हणून माझा काळ संपला आहे. पण विविध लीग स्पर्धांमध्ये खेळाचा नवोन्मेष्क म्हणून माझा नवा प्रवास आजपासून सुरू होत आहे.
अश्विनच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास त्याने आयपीएलमध्ये तब्बल 221 सामने खेळले असून 187 विकेटसह स्पर्धेच्या इतिहासातील पाचव्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने एकूण पाच फ्रँचायझींसाठी खेळला असून, चेन्नई सुपर किंग्जसोबत आठ हंगाम पूर्ण करत त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम यश संपादले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List