लामजना लातूर मार्गावर कार-मोटरसायकलचा भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू
लामजना लातूर मार्गावर निलंगा तालुक्यातील तीन तरूण आपल्या मोटारसायकलने गावाकडे जात होते. त्यावेळी झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
निलंगा तालुक्यातील सरवडी येथील सोमनाथ दयानंद हिप्परगे (वय 22), अभिजित शाहूराज इंगळे ( वय 23), दिंगबर दत्ता इंगळे (वय 27,रा.सरवडी) हे तिघे मोटारसायकलने रविवारी रात्री 11 वाजता लातूरहून गावाकडे येत असताना करजगाव पाटी येथे अचानक समोरून येणाऱ्या कारने त्यांच्या मोटासायकलला जोराची धडक दिली. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List