Explainer : केमोथेरपीच्या वेदनेतून सुटका होणार ? नवी कॅन्सर लस किती प्रभावी ठरणार ?
जगभरात वेगाने पसरणाऱ्या कॅन्सर आजारा संदर्भात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. रशियाच्या संशोधकांनी आता कॅन्सरची व्हॅक्सीन ( Cancer Vaccine ) तयार केली आहे. या व्हॅक्सीनद्वारे कॅन्सरला समूळ नष्ट केले जाऊ शकते असा दावा रशियन तज्ज्ञांनी केला आहे. या कॅन्सर लसीची पहिली क्लिनिकल ट्रायल देखील यशस्वी झाली आहे. चला तर पाहूयात ही व्हॅक्सीन कशी काम करते ?
कॅन्सरची प्रकरणे जगभरात वाढत आहेत. गेल्या काही वर्षांत कॅन्सरने होणाऱ्या मृत्यूंचा आकडाही खूप वाढला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते भारतात दर ९ व्या आणि १० व्या व्यक्तीच्या जीवनात कॅन्सरचा धोका आहे.२०२४ मध्ये भारतात सुमारे १६ लाख नवीन केस समोर आल्या असून सुमारे ९ लाख लोकांचे प्राण कॅन्सरने गेले आहेत. कॅन्सरच्या विरोधात संपूर्ण जग लढत असताना आता संशोधनाला यश आल्याचे दिसत आहे.
रशियाने विकसित केली कॅन्सर लस
अलिकडेच कॅन्सर संदर्भात एक चांगली बातमी समोर आली आहे. त्यानुसार रशियाच्या संशोधकांनी कॅन्सरची लस शोधल्यचा दावा केला आहे. या लसीचा पहिली ट्रायल यशस्वी झाली आहे. चला तर मग तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात अखेर कॅन्सरची व्हॅक्सीन काय आहे ? आणि वैद्यकीय जगतात तिच्या मुळे किती क्रांतीकारक बदल होऊ शकतात ? नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात भारतातील 11 टक्के लोकांना जीवनमानात केव्हा कॅन्सर होऊ शकतो अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या नव्या लसीमुळे कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर आता उपचाराच्या दिशेने नवीन आशा निर्माण झाली आहे.
कॅन्सर व्हॅक्सीनची mRNA तंत्र काय आहे ?
नव्या संशोधनानुसार रशियाने एका नवीन कॅन्सर व्हॅक्सीनचे संशोधन सुरु केले आहे. या कॅन्सर व्हॅक्सीनला ‘EnteroMix’ म्हटले जात आहे. ही कॅन्सर व्हॅक्सीन mRNA तंत्रज्ञानावर आधारित आहे. या व्हॅक्सीनचे सुरुवातीच्या क्लीनिकल ट्रायलमध्ये (फेज 1 ) 100% इफेक्टिव्ह आणि सुरक्षित सिद्ध झाली आहे. यात रुग्णांना कोणत्याही साईड इफेक्टचा सामना करावा लागलेला नाही. आणि या लसीमुळे ट्युमर आक्रसू लागले किंवा त्यांचा वेग मंदावला आहे. यास मोठा मेडिकल अचिव्हमेंट वा क्रांतीकारक शोध मानला जात आहे.
कॅन्सरवर कसे काम करणार mRNA तंत्र ?
ही कॅन्सर व्हॅक्सीन mRNA तंत्राचा वापर करते. यात शरीराला इंस्ट्रक्श देण्यासाठी लहान mRNA मॉलिक्यूल दिले जातात.ज्यामुळे सेल्स एक स्पेसिफिक प्रोटीन तयार करतात. या सेल्स कॅन्सर सेल्सच्या विरोधात इम्युन सिस्टीम ट्रेन करतात.EnteroMix व्यक्तिगत रुपाने स्वतंत्र तयार केलेले असतात. प्रत्येक रुग्णाच्या ट्युमरनुसार जेनेटीक्स नुसार ते तयार केलेले असतात. त्यामुळे विशेष रुपाने त्या व्यक्तीच्या कॅन्सर पेशींना ओळखून त्या नष्ट करतात असे फरीदाबाद येथील मॅरिंगो आशिया हॉस्पिटलचे डॉक्टर मोहित शर्मा यांनी म्हटले आहे.
कोविड-19 व्हॅक्सीनमध्ये वापरले होते mRNA तंत्र
कोविडच्या लसीमध्ये प्रथम mRNA तंत्र वापरले गेले होते. कोविड-19 mRNA व्हॅसीन या आधी आपल्या इम्युन सिस्टीमला व्हायरसली लढण्यासाठी तयार केले होते. तशाच प्रकारे कॅन्सर व्हॅक्सीन EnteroMix इम्यून सिस्टमला कॅन्सर सेल्सची ओळख करणे आणि त्यास संपवण्या करता तयार करते. परंतू यात एक विशेष बाब म्हणजे ही लस व्यक्तीगत रुपाने विकसित केलेली आहे. हे नवीन तंत्रज्ञान कॅन्सर सारख्या दुर्धर आजारात उपचाराच्या दिशेत एक गेम चेंजर सिद्ध होऊ शकते.
किमोथेरपी आणि रेडीएशनहून ही व्हॅक्सीन जादा परिणामकारक ?
कॅन्सरच्या पेशंटना वारंवार कॅन्सरच्या पेशींना नष्ट करण्यासाठी ठराविक काळाने किमोथेरपी तसेच रेडीएशन घ्यावे लागते. ते खूपच वेदनादायी असते. या नव्या व्हॅक्सीन बाबत सांगायचे झाले तर प्रत्येक व्यक्तीसाठी वेग-वेगळी व्हॅक्सीन तयार करावी लागते. ट्युमरच्या गुणसूत्रांची ओळख पटवून या लसी स्वतंत्रपणे तयार केल्या जातात. आणि महत्वाचे म्हणजे या लसी अत्यंत वेगाने विकसित करता येतात. कारण mRNA प्लॅटफॉर्म खुपच वेगाने काम करतो. याशिवाय पारंपारिक कॅन्सर उपचार उदा. किमोथेरपी वा रेडीएशनची तुलनेत या लसीचे साईड इफेक्ट खूपच कमी असतात. या नव्या तंत्राने विकसित केलेल्या या नव्या व्हॅक्सीनमुळे कॅन्सर रुग्णाला चांगला आराम आणि चांगले जीवनपद्धती मिळू शकते.
आशेचा नवा किरण बनणणार ही व्हॅक्सीन?
या व्हॅक्सीनच्या पुढच्या चाचण्यांत आणखीन मोठ्या रुग्ण समुहावर फेज-2 आणि 3 ट्रायल घेण्यात येणार आहेत. या चाचण्यातही ही व्हॅक्सीन जर प्रभावी आणि सुरक्षित आढळली तर भविष्यात कॅन्सर आपल्या जीवनात भिती राहणार नाही. एखादा सामान्य आजाराप्रमाणे तो सहज बरा होणार आजार ठरेल. विशेष करुन भारतात कॅन्सरची औषधे ही प्रचंड महाग आहेत. त्यामुळे भारतातील रुग्णांसाठी ही लस म्हणजे आशेचा नवा किरण ठरु शकणार आहे. या कॅन्सर व्हॅक्सीनने कोलोरेक्टल कॅन्सर वा अन्य दुसऱ्या कॅन्सरलाही समाप्त करता येऊ शकते. आता या व्हॅक्सीनला सुरुवातीला कोलोरेक्टल कॅन्सर, ग्लियोब्लास्टोमा (ब्रेन कॅन्सर) आणि खास प्रकारचा मेलेनोमा ज्यात ऑक्युलर मेलेनोमा ( एक प्रकारचा डोळ्यांचा कॅन्सर ) साठी विकसित करण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List