हिंदुस्थानची सागरी ताकद वाढणार; जर्मनीसोबत 70 हजार कोटींचा करार, हाय-टेक पाणबुड्या बांधणार

हिंदुस्थानची सागरी ताकद वाढणार; जर्मनीसोबत 70 हजार कोटींचा करार, हाय-टेक पाणबुड्या बांधणार

हिंदुस्थान सरकारने हवाई दल आणि नौदलाची ताकद वाढवण्यासाठी दोन मोठे करार करण्यास सहमती दर्शवली आहे. केंद्र सरकारने संरक्षण मंत्रालय आणि माझगाव डॉकयार्डस् लिमिटेडला प्रोजेक्ट 75 इंडियाअंतर्गत 70 हजार कोटी रुपयांच्या सहा पाणबुड्यांच्या खरेदीसाठी बोलणी सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यासोबतच  सरकार इस्रायली रॅम्पेज एअर-टू-ग्राऊंड क्षेपणास्त्रांचा मोठा साठा खरेदी करणार आहे. यामुळे हिंदी महासागरात हिंदुस्थानची ताकद कैकपटीने वाढणार आहे.

केंद्र सरकारने 70 हजार कोटी रुपयांच्या प्रोजेक्ट-75 इंडियाला अखेर मान्यता दिली आहे. याअंतर्गत हिंदुस्थान आणि जर्मनी संयुक्तपणे सहा प्राणघातक पाणबुड्या बांधतील. संरक्षण मंत्रालयाने जानेवारीमध्ये जर्मन कंपनी थायसेनक्रुप मरीन सिस्टम्ससह एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन सिस्टमसह सहा पाणबुड्या बांधण्यासाठी माझगाव डॉकयार्डची भागीदार म्हणून निवड केली होती. संरक्षण मंत्रालय आणि एमडीएल यांच्यात या महिन्याच्या अखेरीस ही प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकारने उच्चस्तरीय बैठकीनंतर हा निर्णय घेतला.

इस्रायली क्षेपणास्त्रांचा साठा खरेदी करणार

हिंदुस्थान सरकार इस्रायली रॅम्पेज हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा मोठा साठा खरेदी करणार आहे. पाकिस्तानातील मुरीदके आणि बहावलपूर येथील दहशतवादी मुख्यालयांवरील अचूक हल्ल्यात रॅम्पेजचा वापर करण्यात आला होता. पारंपरिक डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्या जास्त काळ पाण्याखाली राहू शकत नाहीत. त्यांना काही दिवसांनी पृष्ठभागावर यावे लागते आणि बॅटरी चार्ज कराव्या लागतात. जेव्हा त्या पृष्ठभागावर येतात तेव्हा त्या शत्रूच्या रडारवर सहजपणे येऊ शकतात. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी, एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन प्रणाली विकसित करण्यात आली. एआयपी प्रणालीने सुसज्ज असलेल्या पाणबुड्या 3 आठवडे पाण्याखाली राहू शकतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ratnagiri News – मिरकरवाडा येथील समुद्रात बेपत्ता झालेल्या दोन खलांशांपैकी एकाचा मृतदेह सापडला Ratnagiri News – मिरकरवाडा येथील समुद्रात बेपत्ता झालेल्या दोन खलांशांपैकी एकाचा मृतदेह सापडला
मासेमारी करून परत मिरकरवाडा बंदरात येणारी ‘अमीन आएशा’ ही मच्छिमार नौका बुडाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. या नौकेवर एकूण आठ...
अजित पवारांच्या नावाखाली पुणे बाजार समितीत 200 कोटींचा घोटाळा, आमदार रोहित पवार यांचा आरोप
Ratnagiri News – तिहेरी हत्याकांड प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवा, शिवसेनेची मागणी
इस्रायलमध्ये बस स्टॉपवर अंधाधुंद गोळीबार, 5 जण ठार; 15 जण जखमी
Explainer : केमोथेरपीच्या वेदनेतून सुटका होणार ? नवी कॅन्सर लस किती प्रभावी ठरणार ?
तिसऱ्या पत्नीसोबत कडाक्याचे भांडण, खून करून उचलले धक्कादायक पाऊल
आधारकार्ड ओळखीचा पुरावा म्हणून स्वीकारावाच लागेल! SIR प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे ECI ला महत्त्वाचे आदेश