चेन्नईहून अंदमानला जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान माघारी वळवले, खराब हवामानामुळे लँडिंग अशक्य
चेन्नईहून अंदमानला जाणारे एअर इंडियाचे विमान चेन्नईला माघारी वळवण्यात आले. खराब हवामानामुळे विमान गंतव्यस्थानावर लँड होऊ न शकल्याने माघारी वळवण्यात आले. चेन्नई विमानतळावर सर्व प्रवाशांना सुरक्षित उतरण्यात आले. प्रवाशांसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नईहून अंदमानला जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान IX2610 हे गंतव्यस्थानावर उतरू शकले नाही. विमानाने विमानतळाभोवती प्रदक्षिणा घातली, परंतु खराब हवामानामुळे लँडिंग करणे अशक्य होते. त्यामुळे हे विमान पुन्हा चेन्नईला माघारी वळवावे लागले.
एअर इंडिया एक्सप्रेसने सर्व प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. एअरलाइनने हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था आणि आवश्यक मदत पुरवली आहे. प्रवास रद्द करायचा असल्यास प्रवाशांना रिफंडचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List