मी मेलो तरी चालेल, पण आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही – मनोज जरांगे पाटील
मी मेलो तरी चालेल, पण आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. यातच आज पत्रकार परिषदेत बोलताना ते असं म्हणाले आहेत.
यावेळी बोलताना आंदोलकांना आवाहन करत मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत की, “न्यायालयाच्या नियमांचे पालन करा. तसेच मुंबईकरांना त्रास झाला नाही पाहिजे.” ते म्हणाले की, “आम्ही न्यायालयाच्या नियमांचे पालन करू. सरकाच्या कशाच्या बैठका सुरू आहेत, हे आम्हाला माहीत नाही. मात्र मी चर्चा करायला तयार आहे.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List