दिवसा मजुरी, रात्री अभ्यास; बांधकाम साईटवर काम करणाऱ्या शुभमचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार
ओडिसामध्ये बांधकाम साईटवर मजुरी करणाऱ्या 19 वर्षांच्या शुभम सबरने ‘नीट’ची परीक्षा क्रॅक केली. नेहमीप्रमाणे साईटवर काम करत असताना त्याला ओडिशातून त्याच्या शिक्षकाचा फोन आला. शिक्षकांनी त्याला नीट परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे सांगितले. आदिवासी समाजातून पुढे येऊन कसेबसे शिक्षण घेणाऱ्या शुभमसाठी हा सुखद धक्का होता. नुकतेच त्याला ओडिशातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. शुभमची देशभरात चर्चा होतेय.
‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे समजताच शुभम सबरने म्हटले की, मी आई-वडिलांना सांगितले की, मी आता डॉक्टर होणार आहे. त्यानंतर मी आमच्या कंत्राटदाराला फोन करून सांगितले की, माझा हिशोब देऊन टाका. मला निघायचे आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला 19 वर्षीय शुभम सबरला ओडिशाच्या बेरहमपूरमधील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळाला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List