लवकरच हवाई दलात तेजसचा नवा अवतार, हिंदुस्थान एरोनॉटिक्सकडून 97 लढाऊ विमानांची खरेदी होणार

लवकरच हवाई दलात तेजसचा नवा अवतार, हिंदुस्थान एरोनॉटिक्सकडून 97 लढाऊ विमानांची खरेदी होणार

सप्टेंबरमध्ये हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) हवाई दलाला दोन ‘तेजस मार्क-1 ए’ लढाऊ विमाने देऊ शकते, अशी शक्यता संरक्षण सचिव आर. के. सिंह यांनी व्यक्त केली. तसेच सरकार एचएएल सोबत आणखी 97 तेजस खरेदी करण्यासाठी एक नवीन करार करणार आहे, ज्याची अंदाजे किंमत सुमारे 67 हजार कोटी रुपये असेल. सध्या हवाई दलात 38 तेजसचा समावेश आहे, असेही आर. के. सिंह यांनी सांगितले.

खरे तर, फेब्रुवारी 2021 मध्ये, सरकारने 83 तेजस मार्क-1 ए खरेदी करण्यासाठी एचएएलसोबत 48 हजार कोटी रुपयांचा करार केला, परंतु अमेरिकन इंजिनांच्या वितरणात विलंब झाल्यामुळे एचएएलला अद्याप एकही विमान मिळू शकलेले नाही. तथापि, आता अशी अपेक्षा आहे की 2028 पर्यंत एचएएल सर्व विमाने हवाई दलाला सोपवेल. एलसीए मार्क 1ए हे तेजस विमानाचे प्रगत व्हर्जन आहे. त्यात एव्हियोनिक्स आणि रडार सिस्टीम अपग्रेड केल्या आहेत. एलसीए मार्क-1 ए मधील 65 टक्के पेक्षा जास्त पार्टस् देशात बनवले जातात. तेजसदेखील एचएएलने विकसित केले आहे.

  • एलसीए मार्क 1 एमध्ये एईएसए रडार आहे. या रडारची रेंज जुन्या तेजस विमानांपेक्षा जास्त आहे आणि ते जॅमिंगला चांगला प्रतिकार करते.
  • त्यात हवेत इंधन भरण्याची क्षमता आहे. अपग्रेडेड रडार वार्निंग रिसिव्हर सिस्टीम बसवण्यात आली आहे. त्यामुळे विमानाला असलेले धोके त्वरित ओळखता येतात.
  • डिजिटल मॅप जनरेटर, स्मार्ट मल्टी फंक्शन डिस्प्ले आणि प्रगत रेडियो अल्टीमीटरदेखील आहे.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शेअर बाजारातील टॅरिफची भीती संपली; घसरणीला ब्रेक, निर्देशांक तेजीत शेअर बाजारातील टॅरिफची भीती संपली; घसरणीला ब्रेक, निर्देशांक तेजीत
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेमुळे हिंदुस्थानी शेअर बाजारासह जगातील शेअर बाजारात प्रचंड दबाव होता. त्यामुळे राष्ट्रीय शेअर बाजारासह...
बेकायदा टॉवरप्रकरणी ओस्तवाल बिल्डरला अखेर अटक; बोगस दस्तावेज, बनावट कागदपत्रे, शेकडो ग्राहकांची फसवणूक
विघ्नहर्त्याच्या कृपेने संकट टळले; चालकाचे नियंत्रण सुटले अन् कार विरार जेट्टीवरून थेट खाडीत बुडाली
भाईंदरच्या नैसर्गिक तलावात मूर्ती विसर्जन करणाऱ्या ३१ जणांवर गुन्हा
रोह्यात आदिवासी कुटुंबाला मारहाण; नऊजण गजाआड, आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी
शहापूरच्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी ‘नेटवर्क’मध्ये अडकली; अॅप सुरूच होईना
शहापूरचा भगीरथ अंगणात गंगा आणणार; भूगर्भातील दोन हजार फुटांपर्यंतचा डाटा उपलब्ध होणार