पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला, 30 मिनिटाचा वाहतूक कालावधी आला 6 मिनिटावर

पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला, 30 मिनिटाचा वाहतूक कालावधी आला 6 मिनिटावर

पुणे शहरातील वाढत्या वाहनसंख्येमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सिंहगड रस्त्यावर उभारण्यात आलेला राजाराम पुलापासून ते फन टाईम थिएटरपर्यंतचा उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत दाखल झाला आहे. दुसऱ्या टप्प्याचे आज लोकार्पण करण्यात येऊन हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

सिंहगड रस्त्यावरून धायरी, नऱ्हे, खडकवासला, वडगाव बुद्रुक, नांदेड सिटी तसेच बेंगळुरू-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर दररोज सुमारे दीड लाखाहून अधिक वाहनांची वाहतूक होते. या मार्गाच्या एका बाजूला मुठा नदी व दुसऱ्या बाजूस डोंगर असल्याने पर्यायी रस्ता शक्य नसल्यामुळे उड्डाणपूल उभारणे आवश्यक होते. पुणे महानगरपालिकेमार्फत उड्डाणपुलाचे भूमिपूजन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 21 सप्टेंबर 2021 रोजी करण्यात आले होते.

तीन टप्प्यांत हा उड्डाणपूल पूर्ण करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात सिंहगडकडून स्वारगेटकडे जाणारा 520 मीटर लांबीचा राजाराम पूल चौकातील उड्डाणपूल (खर्च रु. 15 कोटी), दुसऱ्या टप्प्यात विठ्ठलवाडी ते फन टाईम थिएटरदरम्यानचा स्वारगेटकडून सिंहगडकडे जाणारा 2.1 किमी लांबीचा उड्डाणपूल (खर्च रु. 61 कोटी) आणि तिसऱ्या टप्प्यात वीर शिवाजी काशीद चौक ते कै. प्रकाश विठ्ठल इनामदार चौकदरम्यानचा सिंहगडकडून स्वारगेटला जाणारा 1.5 किमी लांबीचा उड्डाणपूल (खर्च रु. 42 कोटी) उभारण्यात आला. या तीनही टप्प्यांसाठी एकूण 118.37 कोटी रुपये खर्च आला आहे.

तीस मिनिटाचा कालावधी आता सहा मिनिटावर

पूर्वी राजाराम पूल ते फन टाईम थिएटर या 2.6 किमी अंतरावरील सहा चौक पार करण्यासाठी सुमारे 30 मिनिटांचा कालावधी लागत होता. नव्या उड्डाणपुलामुळे हा वेळ आता केवळ 5 ते 6 मिनिटांवर आला आहे. पुलाखालील रस्त्याचे सुयोग्य विकसन करून दोन्ही बाजूस तीन लेनची वाहतूक क्षमता, प्रशस्त पदपथ आणि पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच दुभाजकाचे सुशोभीकरण सीएसआर अंतर्गत दोन एजन्सींमार्फत पूर्ण करण्यात आले असून, त्याची देखभाल पुढील पाच वर्षे त्यांच्याच माध्यमातून होणार आहे. या उड्डाणपुलामुळे सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रात्री झोपले ते उठलेच नाहीत, सकाळी दरवाजा उघडला असता पाचही जण बेशुद्धावस्थेत; नेमकं काय घडलं? रात्री झोपले ते उठलेच नाहीत, सकाळी दरवाजा उघडला असता पाचही जण बेशुद्धावस्थेत; नेमकं काय घडलं?
सोलापूरात एक खळबळजक घटना उघडकीस आली आहे. लष्कर भागात राहणारे एक कुटुंब नेहमीप्रमाणे रात्री झोपलं. सकाळी उशीरपर्यंत कुणी उठलं नाही....
चेन्नईहून अंदमानला जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान माघारी वळवले, खराब हवामानामुळे लँडिंग अशक्य
मनात सतत घाणेरडे विचार येतात? शरीरात असू शकते या 5 व्हिटॅमिन्सची कमतरता
धक्कादायक : देशातील 11 टक्के लोकांना आयुष्यभर कॅन्सरचा धोका, काय आहे कारण ?
साखर खाल्ल्यामुळे केस लवकर पांढरे होतात का?
त्वचेवर पांढरे डाग आहेत, घाबरु नका…, तज्ज्ञांकडून जाणून घ्या संपूर्ण माहिती
मी मेलो तरी चालेल, पण आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही – मनोज जरांगे पाटील