शेअर बाजारातील टॅरिफची भीती संपली; घसरणीला ब्रेक, निर्देशांक तेजीत
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेमुळे हिंदुस्थानी शेअर बाजारासह जगातील शेअर बाजारात प्रचंड दबाव होता. त्यामुळे राष्ट्रीय शेअर बाजारासह मुंबई शएअर बाजारातही मोठी घसरण झाली होती. अखेर या आठवड्यात शएअर बाजाराची टॅरिफची भीती संपल्याचे दिसत असून बाजारातील घसरणीला ब्रेक लागला आहे. तसेच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी सुरुवातीपासूनच तेजीत व्यवहार करत आहेत.
ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे शेअर बाजारात झालेली घसरण आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी संपली आणि सेन्सेक्स-निफ्टी जोरदार वाढीसह उघडला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सुरुवातीलाच्या३५० अंकांच्या वाढीसह व्यवहार करत असताना, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकही १०० पेक्षा जास्त अंकांनी वाढून व्यवहार करत होता. सुरुवातीच्या व्यवहारात इन्फोसिस, टेक महिंद्रा, टीसीएस सारख्या शेअर्समध्ये तुफानी वाढ दिसून आली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल आणि शस्त्रास्त्रांच्या खरेदीसाठी हिंदुस्थानवर २५% अतिरिक्त कर लागू करण्यात आला आणि एकूण कर ५०% झाला. तेव्हापासून, त्याचा परिणाम शेअर बाजारात सतत दिसून येत होता आणि सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तीन व्यापारी दिवसांत बरीच घसरण झाली. मात्र, नवीन महिना आणि नवीन आठवड्याच्या सुरुवातीसह, बाजारातील घसरण आणि ट्रम्प करची भीती दोन्ही सोमवारी संपल्याचे दिसून आले.
बाजारात व्यवहाराच्या सुरुवातीला, बीएसई सेन्सेक्स ७९,८२८.९९ वर उघडला, त्याच्या मागील बंद ७९,८०९.६५ च्या तुलनेत किंचित वाढ झाली आणि नंतर काही मिनिटांतच तो ८०,२०६ च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला. त्याचप्रमाणे, एनएसई निफ्टी देखील २४,४३२.७० वर उघडला आणि गती वाढल्यानंतर २४,५४६.६५ च्या पातळीवर पोहोचला.
सोमवारी सर्वात वेगाने सुरुवात करणाऱ्या टॉप-१० शेअर्सबद्दल बोलायचे झाले तर, लार्जकॅपमध्ये इन्फोसिसचा शेअर सुमारे २% ने वाढला, तर टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, अदानी पोर्ट आणि टीसीएसचे शेअर्स १.५०% पेक्षा जास्त वाढले. याशिवाय, मिडकॅप श्रेणीमध्ये, ऑलेक्ट्रा शेअर ७%, सीजी पॉवर शेअर ३.८०% आणि डिक्सन शेअर २.८०% ने वाढला. स्मॉलकॅप श्रेणीमध्ये समाविष्ट असलेल्या कंपन्यांबद्दल बोलायचे झाले तर, येथे अॅपटेकचा शेअर ७.९२% आणि यात्रा शेअर ६.६०% ने वाढला.
सर्व शेअर्स ग्रीन झोनमध्ये वाढीसह सुरू झाले असले तरी, बाजारात तेजी असतानाही काही मोठ्या कंपन्यांचे शेअर्स रेड झोनमध्ये व्यवहार करताना दिसले. यामध्ये लार्जकॅपमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर, मारुती, रिलायन्स, आयटीसी आणि सन फार्मा सारखे मोठे शेअर्स समाविष्ट होते. याशिवाय, मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये, जेएसएल, यूबीएल, गोदरेज इंडिया, भारती हेक्सा, कॅमेलिन फायनान्स, मॅरेथॉन आणि एसटीएल टेकचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List