पंजाबमध्ये 37 वर्षांनंतर भीषण पूर; हजारो गावे जलमय, 61 हजार हेक्टर शेती पाण्यात

पंजाबमध्ये 37 वर्षांनंतर भीषण पूर; हजारो गावे जलमय, 61 हजार हेक्टर शेती पाण्यात

पंजाबमध्ये 37 वर्षांनंतर आलेल्या भीषण पुरामुळे एक हजाराहून अधिक गावे आणि 61 हजार हेक्टरहून अधिक शेती पाण्याखाली गेली आहे. आतापर्यंत 11300 लोकांना वाचवण्यात आले आहे, तर 4700 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. या परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप राज्यातील आप सरकारने केला.

जम्मू-कश्मीरमधील मुसळधार पावसामुळे सतलज, बियास, रावी नद्यांना पूर आला आहे. पुरामुळे गुरुदासपूर, अमृतसर, तरनतारन, फिरोजपूर, पठाणकोट, फाजिल्का, कपूरथला आणि होशियारपुरला जिल्ह्यात मोठे नुकसान झाले. पुरात तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कर, हवाई दल, बीएसएफ, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि पंजाब पोलिसांची टीम काम करत आहे.

आरोप- प्रत्यारोप

  • विरोधकांनी आप सरकारला पूरस्थितीमुळे लक्ष्य केले आहे, तर राज्याचे जलसंपदामंत्री बी. कुमार गोयल यांनी ‘केंद्राच्या अखत्यारीतील भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळाने जूनमध्ये वेळेवर पाणी सोडले असते तर विध्वंस मोठ्या प्रमाणात कमी करता आला असता,’ असा दावा केला.
  • महापुरामुळे पंजाब राज्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रारंभिक अहवालातून असं समजतंय की, फाजिल्का जिह्यात 41099 एकरपेक्षा जास्त जमीन बाधित झालेय. याशिवाय फिरोजपूर, कपूरथला आणि होशियारपूर यासारख्या अन्य जिह्यांतही हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याची माहिती मिळतेय. बरनाला, कपूरथला आणि फिरोजपूर येथे प्रत्येकी एक मृत्यू झाला.
  • पुरामुळे बाधित झालेली एकतृतीयांश गावे गुरुदासपूर जिह्यात (323 गावे) आहेत.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;