एकतर्फी प्रेमातून महिलेच्या पतीला पाठवला दोन किलोचा बॉम्ब
छत्तीसगडमध्ये एका 20 वर्षीय इलेक्ट्रिशियनने एकतर्फी प्रेमातून एका महिलेच्या पतीची हत्या करण्यासाठी बॉम्ब पाठवून दिल्याची धक्कादायक घटना घडली. या महिलेच्या पतीसाठी भेट म्हणून पाठवलेल्या म्युझिक सिस्टम स्पीकरमध्ये त्याने इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस (आयईडी) बसवले होते, असे तपासात दिसून आले. महत्त्वाची बाब म्हणजे आरोपीने ऑनलाइन ‘युटोरियल्स मधून माहिती मिळवून हे आयईडी तयार केला, तसेच हा म्युझिक सिस्टम स्पीकर प्लग इन केल्यावर त्याचा स्पह्ट होईल असे डिझाईन केले. त्यासाठी त्याने गुगल सर्च करून माहिती मिळवली होती. याप्रकरणी मुख्य आरोपी विनय वर्मा आणि अन्य सहा जणांना अटक झाली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List