रात्री झोपले ते उठलेच नाहीत, सकाळी दरवाजा उघडला असता पाचही जण बेशुद्धावस्थेत; नेमकं काय घडलं?
सोलापूरात एक खळबळजक घटना उघडकीस आली आहे. लष्कर भागात राहणारे एक कुटुंब नेहमीप्रमाणे रात्री झोपलं. सकाळी उशीरपर्यंत कुणी उठलं नाही. त्यामुळे शेजाऱ्यांनी जाऊन पाहिले असता कुटुंबातील पाचही जण बेशुद्धावस्थेत आढळले. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाचही जणांना रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
रात्री एलपीजी गॅस गळती झाल्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या शरीरातील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढले. यामुळे फुफ्फुस निकामी होऊन तिघांचा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. हर्ष बलरामवाले अक्षरा बलरामवाले, विमल बलरामवाले यांचा मृत्यू झाला आहे. तर युवराज बलरामवाले आणि रंजना बलरामवाले यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे सोलापूरात एकच खळबळ उडाली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List