विघ्नहर्त्याच्या कृपेने संकट टळले; चालकाचे नियंत्रण सुटले अन् कार विरार जेट्टीवरून थेट खाडीत बुडाली
विरार पश्चिमेतील मारंबळ पाडा जेट्टीवर विघ्नहर्त्याच्या कृपेने मोठे संकट टळले. कार जेट्टीवर नेण्यात येत असतानाच चाल काला अंदाज न आल्याने नियंत्रण सुटले आणि गाडी थेट खाडीत बुडाली. अचानक घडलेल्या या घटनेने प्रवाशांची धावपळ उडाली. स्थानिकांनी तत्काळ धाव घेऊन मदतकार्य सुरू केले व मोठ्या शिताफीने खाडीत पडलेली कार बाहेर काढली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मारंबळ पाडा ते सफाळ्यातील जलसार गावापर्यंत जेट्टी सुरू झाल्याने वाहनचालक व रहिवाशांची मोठी सोय झाली आहे. त्यापूर्वी मोठा वळसा घालून जावे लागायचे. या प्रवासात वेळ व पैसे वाया जात होत. मात्र जेट्टी सुरू झाल्यामुळे काही मिनिटांतच मारंबळ पाड्याहून जल सारपर्यंत पोहोचता येते. शनिवारी दुपारच्या सुमारास जेट्टीवर वाहने नेण्याचे काम सुरू होते. त्यावेळी एका कारचालकाचे नियंत्रण सुटले आणि ही कार पाण्यात कोसळली.
सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात
सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस तसेच स्थानिक प्रशासनाचे विशेष पथक दाखल झाले. काही तासांच्या अथक परिश्रमानंतर खाडीमधील कार बाहेर काढण्यात यश आले. यानिमित्ताने जेट्टीवरील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
कल्याणमध्ये सहाव्या मजल्यावरून लिफ्ट थेट तळमजल्यावर कोसळली; चौघे जखमी
गांधारी परिसरातील रॉयस गॅलेक्सी या इमारतीमध्ये सहाव्या मजल्यावरून थेट तळमजल्यावर लि फ्ट कोसळल्याची भीषण घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. या दुर्घटनेत चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णाल यांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी दोघांचे पाय फॅक्चर झाल्याने त्यांना मुंबईतील रुग्णाल यात हलवण्यात आले आहे.
देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष
रॉयस गॅलेक्सी इमारतीमध्ये दोन लिफ्ट असून त्या वारंवार नादुरुस्त होतात. देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. या अपघातामुळे सोसायटी व्यवस्थापन व बिल्डर यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. तर या घटनेला बेफिकीरपणा जबाबदार असल्याचे हेमंत कुंभार यांनी सांगितले.
गांधारी येथील रॉयस गॅलेक्सी ही आठ मजल्याची इमारत आहे. पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या अंकित मिस्त्री यांच्या घरी गणपती असल्याने दर्शनासाठी काही मित्रमंडळी आल ी होती. त्यात अन्य रहिवासीदेखील होते. दर्शन घेऊन लिफ्टने जात असताना अचानक ही लिफ्ट तळमजल्यावर कोसळली आणि प्रचंड गोंधळ निर्माण झाला. स्थानिकांनी तत्काळ धाव घेऊन लिफ्टमध्ये अडकल ‘ल्या सर्वांना बाहेर काढले. पण त्यातील चार जणांना दुखापत झाली आहे. रॉयस गॅलेक्सी या इमारतीमधील लिफ्ट वारंवार बिघडत असते. सोसायटीच्या व्यवस्थापनाने त्याचे ऑडिट न केल्यामुळे ही वेळ आली असल्याचा आरोप रोहन शहा यांनी केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List