वगळलेल्या 65 लाख मतदारांची यादी जाहीर केली, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निवडणूक आयोगाची तत्परता

वगळलेल्या 65 लाख  मतदारांची यादी जाहीर केली, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निवडणूक आयोगाची तत्परता

निवडणूक आयोगाने बिहारमधील मतदार याद्यांच्या फेरतपासणी नंतर तब्बल 65 लाख मतदारांची नावे यादीतून हटवण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. या वगळलेल्या मतदारांच्या नावांची यादी संकेतस्थळावर जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिले होते. त्यानुसार अखेर निवडणूक आयोगाने वगळलेल्या मतदारांची यादी जाहीर केली आहे.

14 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर निवडणूक आयोगाने आज यादी संकेतस्थळावर प्रकाशित केली. त्याचबरोबर वगळलेल्या नावांमध्ये आपले नाव आहे की नाही हे तपासणे मतदारांना सोपे जावे म्हणून एक लिंकही संकेतस्थळावर देण्यात आली आहे. मतदार याद्यांची फेरतपासणी करताना पारदर्शकपणे काम करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;