बिग बॉसमध्ये आलेला अभिनेता गौरव खन्नाला आहे हा आजार; कोणतेच रंग दिसत नाहीत, या आजाराचं नाव अन् त्याची लक्षणे काय?
टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 19’ सुरू झाला आहे. यावेळी 16 स्पर्धक बिग बॉसमध्ये सामील झाले आहेत. त्यापैकी एक अनुपमामधला अनुज कपाडिया म्हणजेच गौरव खन्ना देखील सामिल झाला आहे. गौरव हा एक स्ट्रॉंग कंटेस्टंट मानला जातो, जो ट्रॉफी जिंकू शकतो असं म्हटलं जातं. गौरवला सगळे ग्रीन फ्लॅग म्हणतात. जेव्हा तो स्टेजवर आला तेव्हा त्याच्याशी संवाद साधत असताना सलमानने त्याला हिरव्या रंगाचा आणि लाल रंगाचा झेंडा दाखवला त्यावेळी त्याने सांगितले की त्याला रंगांमधला फरक त्याच्या डोळ्यांना दिसत नाही. त्याला रंगांधळेपणा आहे. हा एक आजार आहे. नक्की हा काय आजार आहे आणि त्याची लक्षणे काय आहेत हे जाणून घेऊयात.
रंगांधळेपणा म्हणजे काय?
रंगांधळेपणा हा डोळ्यांचा एक आजार आहे ज्यामध्ये व्यक्ती विशिष्ट रंगांना योग्यरित्या ओळखू शकत नाही किंवा रंगांमधला फरक ओळखू शकत नाही. तथापि, त्याला अंधत्व म्हणता येणार नाही कारण रुग्ण पाहू शकतो परंतु रंग ओळखण्यास त्रास होतो. गौरवने शोच्या प्रीमियरमध्ये सांगितलंही आहे की त्याला ट्रॅफिक सिग्नलवरील ट्रॅफिक लाईटचा रंग ओळखण्यास देखील त्रास होतो. कधीकधी त्याला त्याच्या कपड्यांचा रंग निवडण्यातही त्रास होतो. म्हणजे कोणते कपडे आहेत हे ओळखणे कठीण जाते.
हा आजार कसा होतो?
राष्ट्रीय नेत्र संस्थेच्या आरोग्य अहवालानुसार, याला रंग अंधत्व म्हणतात. ज्यामध्ये दृष्टी कमी होत नाही परंतु रंग ओळखण्यात समस्या येते. सर्वात सामान्य रंग दोष म्हणजे लाल आणि हिरव्या रंगातील फरक शोधणे. क्वचित प्रसंगी, निळ्या किंवा पिवळ्या रंगांमध्ये समस्या असतात. बहुतेक प्रकरणांमध्ये या आजाराचे कारण हे अनुवांशिक असू शकते. डॉक्टर म्हणतात की हा आजार पिढ्यानपिढ्या कुटुंबात पुढे चालू शकतो. तथापि, गौरवला हा आजार कसा झाला याबद्दल माहित नाही.
या आजाराची लक्षणे कोणती असतात?
रंगांमध्ये फरक करण्यास अडचण येते
काही वेळेला रंग अधिक उजळ म्हणजे डार्क दिसतात
वेगवेगळ्या रंगांच्या छटा समजण्यात अडचण येते
हा आजार होण्याचा धोका कोणत्या लोकांना जास्त आहे?
जर हा आजार कुटुंबाच्या इतिहासात असेल तर पुढच्या पिढीलाही या आजाराचा त्रास होऊ शकतो
जर कोणाला डोळ्यांच्या कोणही समस्या असतील तरी देखील हा त्रास होऊ शकतो
मधुमेह, अल्झायमर किंवा इतर कोणताही आजार असणे
औषधांच्या दुष्परिणामांमुळे ही कधी कधी अशी परिस्थिती ओढावू शकते
या आजारावर उपाचार काय असू शकतात?
तथापि, सध्या यावर कायमस्वरूपी इलाज नाही. पण डॉक्टरांची ट्रीटमेंट सर्वात महत्त्वाची. त्यांचा सल्ला घेणं कधीही चांगले. परंतु काही विशेष चष्मे किंवा कॉन्टॅक्ट लेन्स काहीप्रमाणात मदत करू शकतात.
मुख्य म्हणजे आपले डोळे हे आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा आणि नाजूक भाग आहे त्यामुळे त्याच्याबाबत कोणतीही अडचण असली तरी घरगुती उपचार करण्यापेक्षा सर्वात आधी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेच असतं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List