Ratnagiri News – राजापूर स्थानकात नेत्रावती एक्स्प्रेसचे जल्लोषत स्वागत, मोटारमनचा केला सत्कार

Ratnagiri News – राजापूर स्थानकात नेत्रावती एक्स्प्रेसचे जल्लोषत स्वागत, मोटारमनचा केला सत्कार

प्रदीर्घ काळ केलेल्या मागणी नंतर कोकण रेल्वे प्रशासनाने अखेर नेत्रावती एक्स्प्रेसला राजापूर रोड स्थानकात थांबा दिला. 15 ऑगस्ट या स्वातंत्रदिनी राजापूर स्थानकात थांबलेल्या नेत्रावती एक्सप्रेसचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यावेळी उपस्थित नागरिकांनी नेत्रावती एक्स्प्रेच्या मोटारमनचा सत्कार केला.

कोकण रेल्वे मार्गांवर राजापूर तालुक्यासाठी राजापूर हे एकमेव परिपूर्ण असे स्थानक असून विद्यमान क्षणी कोकणकन्या, मांडवी, तुतारी, नागपूर, उधना, दिवा-सावंतवाडी अशा ट्रेन थांबतात. मात्र या तालुक्यातील जनतेच्या मागणीनुसार राजापूर स्थानकात नेत्रावतीसह जनशताब्दीला थांबा मिळावा अशी मागील अनेक वर्षात सातत्याने मागणी होत होती. मात्र त्याला यश येत नव्हते. अखेर कोकण रेल्वे प्रशासनाने प्रायोगिक तत्वावर नेत्रावतीला राजापूर रोड स्थानकात थांबा देवून समस्त राजापूरकरांची मागणी पूर्ण केली आहे.
ही ट्रेन स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दिनांक 15 ऑगस्ट पासून राजापूर स्थानकात थांबू लागली आहे. शुक्रवारी (15 ऑगस्ट) लोकमान्य टिळक टर्मिनस वरून सुटलेली नेत्रावती एक्स्प्रेसच्या स्वागतासाठी परीसरातील अनेक नागरिक रेल्वेस्थानकात उपस्थित होते. मात्र ट्रेनला होणारा विलंब पडत असलेला जोरदार पाऊस आणि रेल्वे स्थानकातील अंधार यामुळे उपस्थित असलेल्या नागरिकांनी राजापूर रोड स्थानकातील स्टेशन मास्तर यांचा सत्कार केला होता. त्यानंतर रात्री  आपल्या निर्धारित वेळेपेक्षा विलंबाने म्हणजे रात्री दहाच्या दरम्यान नेत्रावती एक्सप्रेस राजापूर स्थानकात दाखल झाली.
शनिवारी त्रिवेन्द्रम कडून मुंबईकडे जाणारी ट्रेन राजापूर स्थानकात थांबल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी एकच जल्लोष केला आणि ट्रेनचे स्वागत केले. त्यावेळी राजापूर रोड रेल्वे रिक्षा संघटनेचे अध्यक्ष बंड्या शिंदे, संजय लाड, अनिल गुरव, बाबू कोरेगावकर, रमेश सौदळकर, सुनील पोटले, विकास पोटले, विलास कपाळे, सुभाष पिटळेकर, प्रदीप पुजारी, किशोर तांबे, बबन तांबे, इम्तियाज नाईक, प्रविण नकाशे, कैलास मगदूम यांच्यासह अनेक स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बस्स झाल्या बैठका! आजपासून जरांगे पाणीही सोडणार, आंदोलन चिघळणार!! सरकारला नवा प्रस्ताव… ‘सरसकट’ची अडचण असेल तर कुणबी ही उपजात समजून आरक्षण द्या! बस्स झाल्या बैठका! आजपासून जरांगे पाणीही सोडणार, आंदोलन चिघळणार!! सरकारला नवा प्रस्ताव… ‘सरसकट’ची अडचण असेल तर कुणबी ही उपजात समजून आरक्षण द्या!
मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. त्यावर सरकार अद्याप कोणताही तोडगा काढू शकलेले नाही....
जिनपिंगशी सूर जुळले… मोदींचे चीन चीन चू!
सरकारच्या तिजोरीत खडखडाट, पण तरीही साखर कारखान्यांना चार हजार कोटींची थकहमी; आतापर्यंत किमान चोवीस कारखान्यांना हमी
आली गवर सोनपावली…
सामना अग्रलेख – न्या. नागरत्ना, धन्यवाद!
दिल्ली डायरी – चंद्राबाबू ‘तेलगू बीडा’ उचलणार का?
विज्ञान रंजन – डौलदार लाल फूल!