थाटलेला संसार हीच मुंबईच्या फुटपाथची ओळख झालीय! हायकोर्टाकडून पालिकेवर ताशेरे

थाटलेला संसार हीच मुंबईच्या फुटपाथची ओळख झालीय! हायकोर्टाकडून पालिकेवर ताशेरे

मुंबईतील फुटपाथ बेकायदा फेरीवाल्यांनी बळकावले असून त्यावरून चालताना पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. बेकायदेशीर खाद्य पदार्थ विक्रीसह कपडे वाळत घालणे, बांबू लावून ताडपत्री घालणे, संसार थाटने अशी ओळख फुटपाथची झाली असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने यावरून पालिकेवर ताशेरे ओढले. इतकेच नव्हे तर फुटपाथ अतिक्रमण मुक्त करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचे आदेश हायकोर्टाने प्रशासनाला दिले.

अनधिकृत बांधकामप्रकरणी पवईतील सोसायटीने याचिका दाखल केली असून या याचिकेवर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली त्यावेळी फूटपाथच्या दयनीय अवस्थेचे छायाचित्र पाहून खंडपीठ संतापले.

  • पालिका अधिकाऱयांच्या डोळय़ासमोर बेकायदा बांधकामे उभी राहतात, पालिका अधिकारीच अशा बांधकामांना खतपाणी घालतात असे फटकारत एखादा अपघात घडल्यास पालिका अधिकारी त्याची जबाबदारी घेणार का, अशी विचारणाही खंडपीठाने पालिकेला केली.

इतर देशांत पहा

खंडपीठाने इतर देशांचाही दाखला दिला. जगभरातील फुटपाथ पहा किती स्वच्छ आणि चांगल्या स्थितीत असतात, त्यावर कोणतेही अतिक्रमण केलेले नसते, असे फटकारात मुंबईत मात्र स्वच्छ आणि सुस्थितीत फुटपाथ असणे हे एक दिवास्वप्न असल्याचे खंडपीठाने सुनावले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;