Fruit For Diabetic Patients – मधुमेहींनी डोळे झाकून ‘हे’ फळ खायलाच हवं, वाचा या फळाचे आरोग्यवर्धक फायदे
हिंदुस्थानात मधुमेही रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढू लागली आहे. मधुमेही रुग्णांचे हे वाढते प्रमाण अतिशय धोकादायक आहे. मधुमेह होण्याआधी आपण म्हणूनच आपल्या लाईफस्टाइलमध्ये काही महत्त्वाचे बदल करणे हे खूप गरजेचे आहे. परंतु मधुमेह झाल्यावर कुठलीही चिंता न करता आपला आहार व्यवस्थित ठेवल्यास, काहीच काळजीचे कारण नसते. मधुमेहींनी कुठले फळ खावे किंवा काय आहार घ्यावा यावर अनेक तर्क वितर्क लढवले जातात.
मधुमेही रुग्णांसाठी सर्वात उत्तम फळ हे किवी मानले जाते. किवी खाण्यामुळे साखरेची पातळी वाढत नाही. शिवाय किवी हे फळ खाण्याचे इतर अनेक आरोग्यवर्धक फायदे आहेत.
किवी हे फळ का खायला हवे?
रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी किवी हे फळ आपण आपल्या आहारात समाविष्ट करायला हवे. किवीमध्ये व्हिटॅमिन सीची मात्रा ही मुबलक असते. त्यामुळे संसर्गापासून संरक्षण होण्यास मदत मिळते.
किवी केवळ मधुमेहींसाठीच नाही तर इतरांसाठी सुद्धा पोषक आहे. त्यामुळे मधुमेहींसोबतच इतरही या फळांमध्ये असलेल्या पोषक तत्वांचा लाभ घेऊ शकतात. जाणून घेऊया किवीचे आपल्या आहारातील अनन्यसाधारण महत्त्व.
किवीमध्ये व्हिटॅमिन सी अधिक प्रमाणात असते. तसेच अँटीऑक्सिडंट, फाइबर, पोटॅशियम यासारखे पोषक तत्वही किवीत मुबलक प्रमाणात आढळतात. म्हणूनच आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत किवी फळ खाणं सर्वांसाठी खूप गरजेचं झालेलं आहे.
किवीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात. त्यामुळे मलावरोधाचा जर त्रास होत असले तर किवी खावी. फायबरमुळे पचनक्रिया व्यवस्थित होते.
किवी या फळाची खासियत म्हणजे यामध्ये साखरेचे प्रमाण कमी असल्यामुळे, मधुमेही रुग्ण हे फळ बिनदिक्कतपणे डोळे झाकून खाऊ शकतात.
किवीमध्ये व्हिटॅमिन बी-6, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स, फॉस्फरस, मॅग्नेशियम, तांबे, जस्त, बीटा कॅरोटीन सारखे पोषक घटक आढळतात.
किवीमध्ये असलेल्या सेरोटोनिनमुळे आपले हॅप्पी हार्मोन्स वाढण्यास मदत होते. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तज्ज्ञही रोज किवी खाण्याचा सल्ला देतात.
Beauty Tips – सणासमारंभासाठी चेहरा सुंदर दिसावा म्हणून ‘ही’ फळे आहेत अत्यंत उपयोगी, वाचा
स्त्रियांमध्ये चाळीशीनंतर हाडांची दुखणी सुरू होतात, यावर किवी हे अतिशय प्रभावी मानलेले आहे.
किवीमध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे आवश्यक पोषक तत्वे असतात. ज्यामुळे हाडांचे आरोग्य निरोगी राखले जाते. म्हणूनच किवीच्या नियमित सेवनामुळे हाडांचे आरोग्य सुधारते. यामुळेच ऑस्टियोपोरोसिसचा धोकाही कमी होण्यास मदत होते.
किवीमुळे आपल्या हृद्याचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच या फळात असलेल्या गुणधर्मामुळे झोपही उत्तम लागते.
मधुमेहींसाठी किवी हे फळ अगदी योग्य फळ मानले जाते. किवीमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो, तसेच या फळामध्ये उच्च फायबर आणि कमी कॅलरीज असतात. त्यामुळेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी योग्य पर्याय मानला जातो.
Health Tips – साबुदाणा खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का? वाचा
किवी हे रोगप्रतिकारक शक्ती उत्तम होण्यासाठी खूप उपयुक्त मानले जाते. तसेच या फळामधून आपल्या शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे देखील प्रदान होण्यास मदत होते.
किवीमध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी आणि ई केस गळतीवर अतिशय प्रभावी मानले जाते.
किवी रक्तदाब कमी करू शकते आणि रक्त गोठणे कमी करू शकते. यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते.
किवीच्या नियमित सेवनामुळे श्वसनकार्य सुधारते, तसेच दम्याचा त्रासही कमी होतो. किवीमध्ये असलेल्या अ आणि ई या जीवनसत्वांच्या प्रमाणामुळे डोळ्यांच्या आजारांचा धोका कमी होतो.
(घरी कोणतेही उपचार किंवा उपाय करण्यापूर्वी आपण तज्ज्ञ डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List