हिंदुस्थानी अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
हिंदुस्थानचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि अॅक्सिओम-4 मोहिमेतील इतर तीन अंतराळवीर 18 दिवसांच्या वास्तव्यानंतर सुखरुप पृथ्वीवर परतले आहेत. अॅक्सिओम स्पेसने एका निवेदनात म्हटले आहे की, “पृथ्वीवर 23 तासांच्या प्रवासानंतर, क्रू सकाळी 4.31 वाजता (मंगळवार भारतीय वेळेनुसार दुपारी 3.021) कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर उतरले आहेत.”
अंतराळामध्ये शुभांशू यांच्याकडून 17 दिवसांमध्ये विविध 60 वैज्ञानिक प्रयोग करण्यात आले. शुभांशूचा हा अनुभव गगनयान मोहीमेसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. तब्बल 23 तासांच्या प्रवासानंतर शुभांशूसह इतर 3 अंतराळवीर पृथ्वीवर दाखल झाले आहेत. या अंतराळ मोहीमेअंतर्गत मेथी, मूग देखील उगवले.
सविस्तर बातमी लवकरच…
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List