शिर्डीतील साई मंदिरात बॉम्ब ठेवलाय; भाविक आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ बाहेर काढा, धमकीचा मेल येताच सुरक्षा यंत्रणा अलर्ट

शिर्डीतील साई मंदिरात बॉम्ब ठेवलाय; भाविक आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ बाहेर काढा, धमकीचा मेल येताच सुरक्षा यंत्रणा अलर्ट

जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साई मंदिराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. साई संस्थानला पुन्हा एकदा धमकीचा मेल आला असून मंदिर आणि त्यातील खोल्यांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा उल्लेख मेलमध्ये करण्यात आला आहे. भगवंत मान या नावाने हा मेल साई संस्थानला मिळाला आहे. याप्रकरणी साई संस्थानने शिर्डी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.

शिर्डीतील साई मंदिराला दरवर्षी लाखो लोक भेट देतात. यात देश, विदेशातील भाविकांचा समावेश असतो. अशातच मंदिराला बॉम्बने उडवून देण्याची वारंवार धमकी मिळत आहे. आताही [email protected] या आयडीवरून साई संस्थानला धमकीचा मेल आला आहे. साई मंदिर आणि त्यातील खोल्यांमध्ये बॉम्ब ठेवला असून भाविक, कर्मचाऱ्यांना तात्काळ मंदिरातून बाहेर काढण्याचे मेलनमध्ये नमूद करण्यात आले आहे.

सुरक्षा यंत्रणा अलर्ट 

धमकीच्या मेलनंतर साई संस्थानने शिर्डी पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे. तसेच साई संस्थानची सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर असून मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

दोन महिन्यांपूर्वीही आलेला मेल

दोन महिन्यांपूर्वीही शिर्डी साई मंदिर बॉम्बने उडवून देण्याचा मेल आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा धमकीचा मेल आल्याने खळबळ उडाली आहे. आता हा खोडसाळपणा की आणखी काही याबाबत शिर्डी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;