कंत्राटदारांना द्यायला तुमच्याकडे 80 हजार कोटी रुपये तुमच्याकडे नसतील तर राज्य तुम्ही डबघाईला आणलंय – संजय राऊत

कंत्राटदारांना द्यायला तुमच्याकडे 80 हजार कोटी रुपये तुमच्याकडे नसतील तर राज्य तुम्ही डबघाईला आणलंय – संजय राऊत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचं स्मशान केलं आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच कंत्राटदारांना द्यायला तुमच्याकडे 80 हजार कोटी रुपये तुमच्याकडे नसतील तर हे राज्य तुम्ही डबघाईला आणलंय असा घणाघातही संजय राऊत यांनी केला आहे.

दिल्लीत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, या राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे दोन मुख्यमंत्री हे कोणत्या हवेत आणि कोणत्या भ्रमात वावरत आहेत, कोणत्या जगात वावरत आहेत? आणि देवेंद्र फडणवीसांचे पंतप्रधानांनी किती मोठे कौतुक केले. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात दोन दिवस येऊन रहावे. आणि गेल्या पाच महिन्यात शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या झाल्या आहेत त्यांच्या कुटुंबीयांना बोलवावं आणि मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या दोन मुख्यमंत्र्यांनी या राज्याचे कसे स्मशान केले आहे हे समजून घ्यावं. हर्षल पाटीलची आत्महत्या हा सदोष मनुष्यवध आहे. हर्षल पाटीलला जलजीवन मिशनचे पैसे त्याला का मिळू शकले नाहीत यासाठी कोणते अधिकारी आणि कोणते मंत्री जबाबदार आहेत, त्यांच्यावर सरकार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहेत का? सरकारडे एक कोटी चाळीस लाख रुपये नाहीत? कंत्राटदारांची 80 हजार कोटी रुपये सरकारकडे अडकून आहेत. अनेक कंत्राटदारांनी आत्महत्या केल्या, मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर जाळून घेण्याचा प्रयत्न केला. हर्षल पाटीलने आत्महत्या केली तरी सरकारमधील हे तीन लोकं मौजमजा करत फिरत होते असे संजय राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस गडचिरोलीत गेले आणि म्हणाले की शहरात नक्षलवाद वाढला आहे. अहो तुमच्या पक्षात माओवाद आणि नक्षलवाद आहे. नक्षलवाद म्हणजे हिंसाचार असेल तर तुमचे लोक हिंसाचार करत आहे. काल दौंडमध्ये सत्ताधाऱ्याच्या आमदाराच्या भावाने एका नर्तिकेवर गोळ्या चालवल्या, ही हिंम्मत येते कुठून. हा नक्षलवादच आहे. हनी ट्रॅप हा सुद्धा नक्षलवाद आहे. हे सगळं तुमच्या सरकारमध्ये सुरू असताना फडणवीस गोलगप्प्यासारखे गोडगप्पा काय मारताय. महाराष्ट्र लुटला जातोय, महाराष्ट्राची बेअब्रू होतेय अशी टीका संजय राऊत यांनी केली.

संसदेतल्या महिला खासदारांनी निशिकांत दुबेंना जाब विचारला. तुम्ही काय केलं? तुमच्यात हिंमत आहे का? कोकाटे आणि हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या मंत्र्यांना काढण्याची तुमच्यात हिंमत नाही. तुमचे पाय लटपटत आहेत, तुम्ही धमक्या कुणाला देताय? राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे प्रकार थांबवले पाहिजेत. आणि गांभीर्याने हे राज्य चालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दिल्लीत येऊन महाराष्ट्राबद्दल खरं बोले हे खोटं बोलत आहेत. फडणवीसांना खोटं बोलण्याचा आणि विस्मरणाचा आजार झाला आहे.

मंत्र्यांनी केलेल्या लुटमारीमुळे राज्य अडचणीत आले आहे. जलजीवन मिशनमधला हा भंयकर भ्रष्टाचार आहे. जलजीवन, MMRDA, रस्त्यांची अशी अनेक कामं, नगरविकास मधला भ्रष्टाचार, लाडकी बहीणीच्या नमित्ताने होत असलेले घोटाळे आणि ते पैसे जमा होण्यासाठी कसरत होत आहे. ठेकेदारांकडून कामं करून घेतात आणि 80 हजार कोटी रुपये तुमच्याकडे द्यायला नसतील तर राज्य तुम्ही डबघाईला आणलंय.

सरसंघचालक मुस्लिम धर्मगुरुंशी चर्चा करणार आहेत. मग महाराष्ट्रालीत टिल्ल्या पिल्यां मंत्र्यांना आत्महत्या करावी लागेल. सरसंघचालक जर मुस्लिम लोकांशी चर्चा करणार असतील तर आम्ही स्वागत करतो. पण जे सातत्याने विष पेरत आहेत आज त्यांनी विष खाऊन मरण्याची वेळ येईल. मी सरसंघचालकांच्या निर्णयाचे स्वागत करतो, समाजात दुही असता कामा नये. प्रत्येकाचे प्रश्न समजून घेतले पाहिजे आणि ते प्रश्न समजून सरकारडे मांडले पाहिजेत. या देशाच्या नागरिकांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजे मग ते कोणत्याही पक्षाचे असोत. आज बिहारमध्ये SIR च्या नावाखली जे सुरू आहे, एका विशिष्ट जाती धर्माची नावं काढून टाकली जात आहेत. महाराष्ट्रातही तेचं केलं. याला लोकशाही म्हणत नाहीत. म्हणून सरसंघचालक जर अशा प्रकारे काही चर्चा करून काही विषय समोर आणणार असतील तर आम्ही सरसंघचालकांच अभिनंदन करतो असेही संजय राऊत म्हणाले.

उदय सामंतनी राज ठाकरे यांच्या घराखाली एक कॉटेज बांधावं. सन्माननीय राज ठाकरे आणि सन्माननीय उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र आल्यापासून मग उदय सामंत असतील किंवा भाजपचे लोक असतील यांची झोप उडाली आहे. हे जे विष पेरण्याचं काम करत होते आणि महाराष्ट्रामध्ये गोंधळ निर्माण करण्याचं काम करत होते, ते दुकान त्यांच बंद झालं. त्याच्यामुळे काय राज ठाकरेंकडे कोण जातंय आम्हाला त्याच्याशी काही देणंघेणं नाही. आम्ही एकत्र आहोत, दोन्ही बंधूंनी सांगितलेलं आहे. उदय सामंत यांना सवय आहे जायची असेही त्यांचं कोण ऐकत नाही. मी म्हणेने उदय सामंतांनी राज ठाकरे यांचे शिवतीर्थावर त्यांचे घर आहे त्याच्या खाली कॉटेज बांधा आणि तिथं राहा. त्यांचे ठाण्याचे बॉस टेंभीनाक्यावरचे बॉस त्यांना सतत पाठवतात. त्यांना झोपच येत नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यावर महानगरपालिकांसह उद्याच्या विधानसभेत सुद्धा आम्ही यश प्राप्त करू हे त्यांना माहिती आहे.

ही दिल्लीतली युनिव्हर्सिटी आहे. दिल्ली विद्यापीठ आहे. आणि मराठी अध्यासन केंद्रही अनेक ठिकाणी सुरू झालेले आहेत. आता त्या विद्यापीठाच्या कामाची पद्धत मला माहित नाही. आम्ही अशिक्षित अडाणी लोक आहोत. मराठी जरी नसले तरी त्यांच मराठी विषयी काय आस्था आहे त्यातून भविष्यामध्ये कशा प्रकारे काम केलं जातंय हे पाहून त्याच्यावर मत व्यक्त कराव लागेल. या क्षणी विद्यापीठामध्ये मराठी अध्यासन केंद्र सुरू होते महत्त्वाच आहे.

अनिल परब यांची विश्वासहर्ता ही रामदास कदमांपेक्षा जास्त आहे. ते पक्षाशी निष्ठावान आहेत त्यांनी स्वार्थासाठी कधी पक्ष सोडला नाही. त्यांच्यावर ईडीच्या रेड्स पडल्या, त्यांना अटक करण्याचा प्रयत्न झाला, त्यांचा कुटुंबाना त्रास देण्याचा प्रयत्न केला. पण ते मातोश्रीशी एकनिष्ठ आहे.

जगदीप धनखड यांची भेट होऊ शकली नाही. बहुतेक त्यांच्यावर बंधनं आलेली दिस दिसतात कोणाला भेटू नका म्हणून. सरकारने ऑपरेशन सिंदूरवर 16 तास चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे. आता फक्त बिहारच्या प्रश्नावरती आमची भूमिका आहे की बिहारमध्ये जो मतदार याद्यांमध्ये घोटाळा सुरू केला भारतीय जनता पक्षाने त्याच्यावर चर्चा व्हावी असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गूगल मॅपने धोका दिला, चुकीचा मार्ग दाखवल्याने गाडी थेट ओढ्यात गूगल मॅपने धोका दिला, चुकीचा मार्ग दाखवल्याने गाडी थेट ओढ्यात
अज्ञात मार्ग दाखवण्यासाठी गूगल मॅपची मोठी मदत होत असल्याने प्रत्येक जण याचा वापर करतो. मात्र याच गूगल मॅपमुळे जीव धोक्यात...
महायुतीत मंत्र्यांमध्ये जुंपली; सामाजिक न्याय विभागाची माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेतली बैठक, शिरसाट यांनी व्यक्त केली नाराजी
Judge Cash Row – न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावर राज्यसभेत महाभियोगाची प्रक्रिया चालणार नाही!
Video – पंतप्रधान मोदी म्हणजे मीडियाने फुगवलेला फुगा, राहुल गांधी यांची सडकून टीका
हाडात जमलेले युरिक एसिड असे बाहेर काढा, हे 4 उपाय नक्की आजमावा
कारवाई केली नाही तर कोडगेपणा तयार होईल; वादग्रस्त मंत्री, आमदारांवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी अजित पवार, मिंध्यांचे कान टोचले!
माघी गणपतीच्या विसर्जनाला परवानगी द्या, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी