त्रिभाषा सूत्र सहावीनंतर चालेल, केंद्राचे लोकसभेत स्पष्टीकरण; पहिलीपासून हिंदीसक्ती लादणाऱ्या महायुती सरकारला चपराक
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीसक्ती लादणाऱ्या महायुती सरकारला आज जोरदार चपराक बसली. त्रिभाषा सूत्रात कोणत्याही दोन भाषा भारतीय असाव्यात इतकीच अपेक्षा असून कोणत्याही विशिष्ट भाषेसाठी सक्ती केली जाणार नाही. शिवाय, तिसरी भाषा सहावी किंवा सातवीनंतरही शिकता येईल, असे केंद्र सरकारने आज लोकसभेत स्पष्ट पेले.
महाराष्ट्रानंतर दक्षिणेकडील राज्यांतही त्रिभाषा सूत्राला विरोध तीव्र होऊ लागला आहे. या विरोधाची धग संसदेपर्यंत पोहोचली. डीएमके खासदार माथेश्वरन व्ही एस यांनी या संदर्भात केंद्र सरकारला प्रश्न विचारला होता. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी त्यास लेखी उत्तर दिले. केंद्र सरकारचे हे उत्तर शिवसेना, मनसे व मराठी माणसाच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब करणारे ठरले आहे.
लेखी उत्तरात काय?
- शिक्षणात त्रिभाषा सूत्र कायम राहील
- त्रिभाषा सूत्रात कोणत्या भाषा हा निर्णय राज्यांचा असेल.
- कोणत्याही विशिष्ट भाषेसाठी केंद्र सरकार आग्रही नाही.
- तिसरी भाषा 6 वी किंवा 7 वी इयत्तेतही निवडता येईल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List