60 दिवसांत नव्या उपराष्ट्रपतींची निवड, राज्यसभेचे उपसभापती पाहणार काम
उपराष्ट्रपदीपद रिक्त झाल्यानंतर भारतीय संविधानानुसार या रिक्त पदासाठी 60 दिवसांच्या आत निवडणूक घ्यावी लागणार आहे. या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व सदस्य मदतान करतात. मतदानासाठी प्रमाण प्रतिनिधीत्व प्रणाली आणि एकल हस्तांतरणीय मत या पद्धतीचा वापर करण्यात येईल. दरम्यान, संविधानानुसार उपराष्ट्रपतीपद रिक्त झाल्यास राज्यसभेचे उपसभापती, राज्यसभेचे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहतात. सध्या हरिवंश नारायण सिंह हे राज्यसभेचे उपसभापती आहेत.
पदावर असताना राजीनामा देणारे दुसरे उपराष्ट्रपती
2022 मध्ये जगदीप धनखड यांनी 14 वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. तत्पुर्वी त्यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून काम पाहिले. 74 वर्षीय धनखड यांनी आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापुर्वीच आज उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला आहे. पदावर असताना राजीनामा देणारे धनखड हे दुसरे उपराष्ट्रपती आहेत. यापूर्वी 20 जुलै 1969 रोजी व्ही. व्ही. गिरी यांनी राजीनामा दिला होता.
गेल्या महिन्यात अचानक प्रकृती बिघडली
गेल्या महिन्यात उत्तराखंड येथे कुमाऊं विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात धनखड प्रमुख पाहुणे होते कार्यक्रमानंतर त्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या छातीत दुखू लागले. सुरक्षा रक्षक आणि माजी खासदार महेंद्र पाल यांनी त्यांची काळजी घेतली. राजभवनात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांची आरोग्य तपासणी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List