पावसाळ्यातील आर्द्रतेतही तुमचा मेकअप जास्त काळ टिकेल, फक्त ‘या’ टिप्स करा फॉलो

पावसाळ्यातील आर्द्रतेतही तुमचा मेकअप जास्त काळ टिकेल, फक्त ‘या’ टिप्स करा फॉलो

प्रत्येक मुलीला व महिलेला मेकअप करायला आवडते. त्यामुळे चेहऱ्याचा लूक एकदम आकर्षक दिसतो. कॉलेज, ऑफिस किंवा एखादी पार्टी किंवा प्रत्येक खास प्रसंगी महिला मेकअप करतातच. अशातच पावसाळ्याच्या दिवसात वातावरणातील दमट हवामानामुळे मेकअप चेहऱ्यावर जास्त वेळ राहत नाही. यासाठी मेकअप करताना नेहमी त्वचेच्या प्रकारानुसार आणि हवामानानुसार मेकअप उत्पादने वापरणे योग्य आहे. त्यामुळे मेकअप लवकर खराब होत नाही.

उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात जेव्हा हवेतील आर्द्रता वाढते तेव्हा जास्त वेळ मेकअप टिकवून ठेवणे खूप कठीण होते. घाम, चिकटपणा आणि त्वचेवरील अतिरिक्त तेल यामुळे मेकअप पसरू लागतो. अशा वेळेस मेकअप बराच वेळ टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही या टिप्स अवलंबू शकता. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…

तुमचा चेहरा व्यवस्थित स्वच्छ करा

दमट ऋतूमध्ये मेकअप करण्यापूर्वी त्वचा पूर्णपणे स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे. यासाठी ऑईल-फ्रीफेस वॉश वापरा. त्यानंतर चेहऱ्यावर टोनर लावा. यामुळे छिद्रे घट्ट होण्यास आणि अतिरिक्त तेल नियंत्रित करण्यास मदत होईल. यानंतर त्वचेला ऑईल-फ्री किंवा मॅटिफायिंग मॉइश्चरायझर वापरा, जे त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करेल आणि त्वचा चिकट वाटणार नाही.

प्रायमर वापरण्याची खात्री करा

मेकअप करताना नेहमी निश्चितपणे प्राइमर वापरा, कारण ते मेकअप बराच वेळ टिकवून ठेवण्यास मदत करते. तसेच प्रायमर हे त्वचा मऊ करण्यास मदत करते. यासोबतच उन्हाळ्यात आणि दमट हवामानात मॅट फिनिश देणारा प्राइमर वापरा, जो त्वचेवरील तेल नियंत्रित करण्यास आणि मेकअप दीर्घकाळ टिकण्यास मदत करू शकतो.

योग्य उत्पादने वापरा

उन्हाळा व पावसाळा या ऋतूमध्ये जड आणि क्रिमी फाउंडेशन वापरल्याने चेहऱ्याला अधिक घाम येऊ लागतो त्यामुळे त्वचा चिकट होते. यासाठी वॉटर-बेस्ड किंवा मॅट फिनिशसह हलके फाउंडेशनचा वापर करा. दमट हवामानात बीबी क्रीम किंवा टिंटेड मॉइश्चरायझर वापरणे चांगले. यामुळे त्वचेला नैसर्गिक लूक देखील मिळेल. यासोबतच कॉम्पॅक्टने मेकअप सेट करा, विशेषतः कपाळ, नाक आणि हनुवटीसारख्या टी-झोनजवळ लावा कारण येथे जास्त घाम आणि तेल येते.

वॉटरप्रूफ प्रोडक्ट्सचा वापर

डोळ्यांच्या आणि ओठांच्या मेकअपसाठी वॉटरप्रूफ आयलाइनर, लिपस्टिक आणि मस्कारा वापरा. यामुळे घाम किंवा पावसामुळे मेकअप त्वचेवर पसरणार नाही. मॅट लिपस्टिक बराच वेळ टिकते आणि डागांपासून देखील सुरक्षित असते. त्याच मेकअप सेटिंग स्प्रे वापरा. ब्लॉटिंग पेपर, टिश्यू आणि ब्लॉटिंग पेपर सोबत ठेवा. जर चेहऱ्यावर घाम किंवा तेलकटपणा जाणवत असेल तर ते हळूवारपणे त्वचेवर टॅप करा. यामुळे मेकअप खराब होणार नाही आणि अतिरिक्त तेल देखील निघून जाईल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Skin Care – तुमच्या त्वचेच्या सौंदर्याचे रहस्य दडलंय या फुलामध्ये, वाचा Skin Care – तुमच्या त्वचेच्या सौंदर्याचे रहस्य दडलंय या फुलामध्ये, वाचा
झेंडू हे एक असे फूल आहे जे प्रत्येक शुभ कार्यासाठी वापरले जाते. मुख्य म्हणजे झेंडूचे फूल हे बारमाही उपलब्ध असते....
मी नैराश्यग्रस्त असताना हिंदुस्थानात परतले, माझे डोके भिंतीवर आपटावे असे सतत वाटायचे! शिल्पा शिरोडकर
हिंदुस्थानी जोडप्याचा अमेरिकेत कोट्यवधींचा घोटाळा, 100हून अधिक लोकांना लावला चुना
शाळकरी मुलीच्या गळ्याला चाकू लावला, एकतर्फी प्रेमातून माथेफिरू कृत्य
ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप्सचे प्रमोशन; प्रकाश राज, राणा दग्गुबत्ती यांच्यासह चौघांना ईडीचे समन्स
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग, सप्टेंबर महिन्यात पर्यंत मोठे बदल होण्याची शक्यता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठला युती धर्म पाळत आहेत? माणिकराव कोकाटे प्रकरणी आदित्य ठाकरे यांचा सवाल