एआयने हिरावली हजारो कर्मचाऱ्यांची नोकरी, अॅमेझॉनमध्ये पुन्हा मोठी नोकरकपात
कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने पुन्हा एकदा नोकरकपातीची घोषणा केली आहे. मागील वर्षात अॅमेझॉनने 27 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते आणि अजूनही अॅमेझॉन वेगवेगळ्या विभागातून कर्मचारी कपात करत आहे. अॅमेझॉनने नवीन वर्षात ‘अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस’मधील त्यांच्या क्लाऊड कॉम्प्युटिंग विभाग कर्मचाऱ्यांना काढून टाकणार असल्याचे जाहीर केले. कंपनीचे सीईओ अँडी जॅसी यांनी अलीकडेच ‘एआयमुळे अॅमेझॉनमधील काही प्रमुख पदे संपुष्टात येतील,’ असे वक्तव्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकऱ्या जाण्याचे संकट उभे ठाकले आहे.
कंपनीने टाळेबंदीची नेमकी संख्या अद्याप उघड केलेली नाही. परंतु कंपनीने हे मान्य केले आहे की, नोकर कपातीच्या निर्णयाचा ‘अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस’मधील विशिष्ट गटावर परिणाम झाला आहे. प्रभावित गटांमध्ये ‘अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस’च्या ट्रेनिंग आणि सर्टिफिकेशन युनिटचा समावेश आहे. तज्ञाच्या अंदानुसार, ‘अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस’मध्ये एकूण 10 टक्के कर्मचारी कपात होईल. तसे प्रिंसिपल लेव्हलच्या पदांमध्ये 25 टक्के कपात होण्याची शक्यता आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या कंपनीच्या बैठकीत सीईओ अँडी जॅसी यांनी असे सुचवले की, जनरेटिव्ह एआयमुळे काही नोकऱ्या कमी होऊ शकतात आणि नवीन भूमिकांची मागणी निर्माण होऊ शकते. अॅमेझॉनच्या अंतर्गत अहवालावरून असं समजतंय की, कंपनी एआय टुल्स आणि एजंट्सला हळूहळू पुढे येत आहेत. एआय टुल्स आधीच्या कर्मचाऱ्यांची जागा घेत आहे. ज्या कामासाठी आधी जास्त कर्मचारी लागत होते, तिथे आता कमी कर्मचारी लागतील, असे अँडी जॅसी यांनी यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List