Eye Care Tips – मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळे दुखताहेत का, मग हे उपाय करून बघा
सध्याच्या घडीला आपल्याला मोबाईल बघण्याचे व्यसन लागलेले आहे. यामुळे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यावर अतिशय वाईट परीणाम होत आहे. डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी काही छोट्या गोष्टींचा अवलबं आत्तापासून करायला हवा. डोळ्यांची समस्या ही सध्याच्या घडीला सर्वच वयोगटामध्ये दिसून येत आहे. मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे डोळ्यांच्या समस्या वाढताना दिसत आहेत. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाचे एक स्वतःचे काम आहे. हात, पाय, नाक आणि डोळे हे आपल्यासाठी फार महत्त्वाची भूमिका बजावतात. खासकरून डोळे निरोगी ठेवण्याकडे आपण मात्र वरचेवर दुर्लक्ष करत असतो. त्यामुळेच मग लवकर चष्मा लागणं किंवा डोळ्यातून पाणी येणे अशा समस्या उद्भवतात.
मोबाईल सतत बघितल्यामुळे डोळे दुखणे, डोळ्यातून पाणी येणे अशा समस्या उद्भवतात. केवळ इतकेच नाही तर, सतत संगणकावर बसूनही डोळे दुखण्याचे प्रमाण वाढत आहे. सध्याच्या घडीला अनेक कंपन्या वर्क फॉर्म होमची सुविधा देतात. या सुविधेमुळे आपण घरातूनच कार्यालयाचे काम करू लागलोय. अशावेळी डोळ्यांचे आरोग्य कसे निरोगी राखायचे याकडेही लक्ष द्यायला हवे. नुसते लॅपटॉपच्या स्क्रिनसमोर बसून आपण असल्यामुळे डोळे थकतात आणि डोळ्यांवर ताण येतो.
Health Tips – महिलांनी गुलकंद खाल्ल्यास मिळतील हे आरोग्यवर्धक फायदे, वाचा
डोळे निरोगी ठेवण्यासाठी हे उपाय करुन बघा
डोळ्यांवर थंड पाणी मारताना एकदम जोराने कधीच मारू नये. त्याने डोळ्यांना त्रास होण्याचा, संभव असतो. हळुवारपणे थंड पाणी मारल्यामुळे, डोळ्यांना अधिक आराम मिळतो. कामातून ब्रेक घेऊन, किमान दोन ते तीन तासांनी डोळ्यांवर थंड पाणी मारावे. थंड पाणी मारल्यामुळे डोळ्यावरील ताण दूर होईल तसेच, जळजळही कमी होते.
Health Tips – रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिताय का, मग या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या
डोळ्यांवरील ताण दूर करण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे गुलाबजलाचा वापर करणे. डोळ्यांचा थकवा गुलाबजलच्या वापराने लगेच दूर होतो. थोड्याशा पाण्यात गुलाबजल मिसळावे. त्यानंतर कापूस भिजवावा. त्यानंतर तो कापूस किमान पाच ते सात मिनिटे आपल्या डोळ्यांवर तसाच ठेवावा. हा प्रयोग तुम्ही नक्की करा. बघा तुमच्या डोळ्यांना पाचच मिनिटांमध्ये किती आराम मिळेल. डोळ्यांचा थकवा लगेच दूर करण्यासाठी हा सर्वात मोठा रामबाण उपाय आहे.
(कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List