‘जीवनवाहिनी’वर मृतदेहांचा खच अन् रक्ताचा सडा… 11 जुलै 2006… मुंबईकरांसाठी काळा दिवस!

‘जीवनवाहिनी’वर मृतदेहांचा खच अन् रक्ताचा सडा… 11 जुलै 2006… मुंबईकरांसाठी काळा दिवस!

11 जुलै 2006… देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची जनता नेहमीप्रमाणे अविरत धावत होती. मुंबईकरांचा संपूर्ण दिवस रोजच्या धावपळीत गेला. मात्र दिवसाची अखेर होता होता ‘जीवनवाहिनी’ उपनगरी रेल्वे प्रचंड हादरली. सायंकाळी 6 वाजून 24 मिनिटांनी लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यात एकापाठोपाठ एक बॉम्बस्फोट झाले. 11 मिनिटे स्फोटांची मालिका सुरू राहिली आणि ‘जीवनवाहिनी’वर मृतदेहांचा खच आणि मृत व जखमी प्रवाशांच्या रक्ताचा सडा पडला. तब्बल 189 निष्पाप नागरिकांचा बळी गेला, तर 824 हून अधिक लोक जखमी झाले. त्यामुळे तो मंगळवार मुंबईकरांसाठी काळा दिवस ठरला. बॉम्बस्पह्टांत झालेल्या प्रचंड जीवितहानीने महाराष्ट्रासह संपूर्ण देश सुन्न झाला होता.

पश्चिम रेल्वे मार्गावरील माटुंगा ते मीरा रोड स्थानकांदरम्यान 11 मिनिटांत लागोपाठ सात बॉम्बस्पह्ट झाले होते. त्या स्पह्टांमध्ये बॉम्ब ठेवणारा सलीम नावाचा पाकिस्तानी दहशतवादी ठार झाल्याचा दावा पोलिसांनी त्यावेळी केला होता. मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी स्पह्टानंतरचा तो सर्वात मोठा मानवी संहार होता.

आयएसआयच्या आदेशावरून स्फोट

महाराष्ट्र एटीएसने काही आठवडय़ांनंतर बॉम्बस्फोटांच्या कटाचा पर्दाफाश करून 12 जणांवर आरोप ठेवले होते. स्पह्टांचा कट पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या आदेशावरून रचण्यात आला आणि लष्कर-ए-तोयबाने सिमीच्या मदतीने तो कट अमलात आणला होता. या कटात वापरलेले बॉम्ब गोवंडीच्या झोपडपट्टीत प्रेशर कुकरमध्ये तयार केले होते आणि नंतर लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यात ठेवले होते, असा दावा एटीएसने केला होता.

एटीएसने केलेला दावा गुन्हे शाखेने फेटाळला

एटीएसने केलेला दावा दोन वर्षांनंतर, 2008 मध्ये मुंबई गुन्हे शाखेने फेटाळला होता. गुन्हे शाखेने ‘इंडियन मुजाहिदीन’च्या सादिक शेखला अटक केली आणि प्रकरणाला नवे वळण मिळाले होती. इंडियन मुजाहिदीननेच बॉम्बस्पह्टाचा कट रचला होता आणि सादिकने इतरांच्या मदतीने मिळून बॉम्ब ठेवले होते. एटीएस आणि गुन्हे शाखेच्या तपासातील विसंगतीदेखील खटल्यावर परिणाम करणारी ठरल्याचे जाणकारांचे मत आहे.

पाकिस्तानातून आले होते 11 दहशतवादी

लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्पह्ट घडवून मोठी मनुष्यहानी करण्याच्या इराद्याने पाकिस्तानातून 11 दहशतवादी आले होते. त्यातील एक दहशतवादी 22 ऑगस्ट 2006 रोजी अॅण्टॉप हिल परिसरात झालेल्या चकमकीत ठार मारला गेला होता. मोहम्मद अली याला दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) चकमकीत ठार केला, तर दुसरा दहशतवादी बॉम्ब ठेवताना ठार झाल्याचा दावा तपास यंत्रणेने केला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

या 5 लोकांसाठी नारळपाणी विषापेक्षा कमी नाही, तुम्हीही तिच चूक करत असाल तर आजच बंद करा या 5 लोकांसाठी नारळपाणी विषापेक्षा कमी नाही, तुम्हीही तिच चूक करत असाल तर आजच बंद करा
नारळ पाणी हे आपल्या शरीरासाठी किती चांगले असते हे सर्वांनाच माहित आहे. त्याच अनेक पोषक घटक असतात जे शरीरासाठी अमृतासमान...
Kalyan News – कल्याणमध्ये परप्रांतीयांची पुन्हा मुजोरी! मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण
Apache Helicopters – आता शत्रूंची खैर नाही! हिंदुस्थानी सैन्याला मिळाले अपाचे हेलिकॉप्टर
हिंमत असेल तर सीबीआय चौकशी करा; एकनाथ खडसे यांचे गिरीश महाजनांना आव्हान
आई आणि बायकोच्या नावाने डान्सबार काढून मुली नाचवता, लाज नाही वाटत? गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी राजीनामा द्यावा, अनिल परब यांची मागणी
62 वर्षांच्या शौर्याला सलाम! हवाई दल MIG-21 ला सन्मानाने देणार निरोप
लोकल ट्रेन बॉम्बस्फोटप्रकरणी महाराष्ट्र सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; मुंबई हायकोर्टाच्या निकालाला आव्हान