आता यूपीआयवर मिळणार कर्ज; ज्यासाठी कर्ज घेतले त्यासाठीच खर्च करावे लागणार, एनपीसीआयचा महत्त्वाचा निर्णय
सध्या डिजिटल पेमेंटचे प्रमाण वाढले आहे. अनेक लहानमोठ्या गोष्टीचे पेमेंट युपीआयच्या माध्यमातून केले जाते. या पार्श्वभूमीवर यूपीआयच्या वापराबाबत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) एक मोठे पाऊल उचलले आहे. आता यूपीआयचा वापर केवळ पेमेंट करण्यासाठीच नव्हे तर कर्ज घेणे व ती रक्कम खर्च करण्यासाठीही करता येईल. ही नवीन सुविधा 31 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे. त्यामुळे आता ग्राहक फोन पे, गूगल पे, पेटीएम यासारख्या अॅप्सच्या माध्यमातून आपल्या बँकेतून किंवा वित्तीय संस्थांमधून घेतलेल्या कर्जाला डायरेक्ट लिंक करून त्यातून ट्रान्झॅक्शनही करू शकतात.
यूपीआयच्या नवीन नियमात यूजर पी2पी सोबत पी2पीएम व्यवहार करू शकणार आहे. तसेच रोख रक्कमही काढता येणार आहे. त्यासाठी एनपीसीआयने काही नियम आणि कायदे तयार केले आहेत. सध्या यूजर एका दिवसांत एक लाखांपर्यंत पेमेंट करु शकणार आहे. तसेच एका दिवसात रोकड 10 हजारांपर्यंत काढता येणार आहे. तसेच पी2पी नियमित व्यवहारांची लिमिट 20 केली आहे. एनपीसीआय वेबसाइटनुसार, यूपीआयवरील प्री-मंजूर क्रेडिट लाइन तुम्हाला तुमच्या बँकेकडून प्री-मंजूर क्रेडिट लाइन मिळवण्याची परवानगी देणार आहे.
कर्जाचे व्यवहार ऑनलाइन शक्य
यूपीआय पेमेंट सिस्टमला सोपी बनवण्यासाठी एनपीसीआयकडून अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. सध्या यूपीआय यूजर फक्त त्यांचे बचत खाते किंवा ओव्हरड्राफ्ट खाते लिंक करू शकतात. याद्वारेच पेमेंट करता येते. काही रुपे क्रेडिट कार्ड देखील यूपीआयला जोडलेले आहेत. परंतु त्यांची संख्या कमी आहे. आता नवीन नियमाने गोल्ड लोन, पर्सनल लोनचे पैसे बँकेत न जाता यूजर ऑनलाइन माध्यमातून काढता येणार आहे. यूपीआयच्या माध्यमातून तुम्ही कोणते पेमेंट करु शकणार आहे, त्यासंदर्भात बँक निर्णय घेणार आहे. ही सुविधा लहान व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर असणार आहे. हे व्यापारी 2 ते 3 लाख रुपयांचे व्यावसायिक कर्ज घेतात. त्या लोकांना पेमेंट करण्यासाठी वारंवार बँकेत जावे लागणार नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List