पूजा खेडकरचे ओबीसी नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र रद्द, नाशिक विभागीय आयुक्तांची कारवाई
नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी पूजा खेडकर यांचे ओबीसी नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र रद्द केले आहे. पूजा खेडकर या भारतीय प्रशासकीय सेवेच्या माजी प्रशिक्षणार्थी असून तिच्यावर 2022 ची नागरी सेवा परीक्षा खोटी ओळख व बनावट कागदपत्रे वापरून पास केल्याचा आरोप आहे.
हिंदुस्तान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. पूजा खेडकर यांची प्रशिक्षणाची मुदत आधीच संपवण्यात आली आहे. आपले प्रमाणपत्र रद्द केल्या प्रकरणी पूजा खेडकर या विरोधात मंत्रालयात तक्रार करणार आहे.
विभागीय आयुक्त गेडाम यांनी खेडकर यांचा ओबीसी प्रमाणपत्रासाठीचा अर्ज एक महिन्यापूर्वीच फेटाळला होता. खेडकर यांनी आता राज्याच्या ओबीसी विभागाचे सचिव अप्पासाहेब धुळे यांच्याकडे आपला अर्ज दाखल केला आहे. त्यासाठी पूजा खेडकरने चार आठवड्यांची मुदतही मागितली आहे. पूजा खेडकर या 2023 च्या आयएएस बॅचमधील अधिकारी असून तिच्यावर ओबीसी नॉन-क्रीमी लेयर आणि दिव्यांग आरक्षणाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. पूजा खेडकरने खोटी जात आणि दिव्यांग प्रमाणपत्रे दिली असून मानसिक आजार, कमी दृष्टी व हालचालींची अडचण असे आजार असल्याचे दाखवून आरक्षण घेतल्याचे आरोप आहेत.
ओबीसी नॉन क्रिमीलेयरचे आरक्षण घेण्यासाठी उमेदवाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक असते. पूजान खेडकरने आपल्या कुटुंबाचे वार्षिक 6 लाख रुपयाचे असल्याचे दाखवले होते. मात्र चौकशीत तिच्या कुटुंबाकडे 23 जंगम मालमत्ता आणि 12 गाड्या असल्याचे समोर आले. पूजाचे वडील दिलीप खेडकर हे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी होते आणि त्यांनी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार निवडणूक लढवताना 40 कोटींची संपत्ती जाहीर केली होती.
जुलै 2024 मध्ये UPSC ने पूजा खेडकरची उमेदवारी रद्द केली, तसेच पुढील परीक्षा देण्यापासूनही बंदी घातली होती. इतकंच नाही तर पूजाविरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्रांबद्दल गुन्हा दाखल केला होता. केंद्र सरकारने सप्टेंबर 2024 मध्ये पूजाला पदावरून बडतर्फही केले होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List