मुंबई-अहमदाबाद रस्त्याची 400 कोटी खर्च करूनही दुरवस्था, निकृष्ट दर्जाची कामे; खराब रस्त्यांमुळे तीस जणांचा मृत्यू
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदर ते आच्छाड या 125 किमी टप्प्यातील काँक्रीकीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या रस्त्याच्या कामावर 400 कोटी रुपये खर्च झाल्याचे स्पष्ट झाले. या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे तीस जणांचा मृत्यू झाल्याचेही पुढे आले आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय मार्गावरील घोडबंदर ते आच्छाड रस्त्याच्या निकृष्ट कामकाजाबद्दल विधानसभा सदस्य विलास तरे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील उत्तरात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी ही माहिती दिली. निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामामुळे तीस जणांचा मृत्यू झाल्याच्या प्रश्नावर अंशतः खरे असल्याचे उत्तरात नमूद केले आहे.
पोलीस विभागाच्या अहवालानुसार जानेवारी ते जून 2025 या कालावधीत 50 गंभीर अपघात झाल्याची नोंद आहे. पण हे अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे निदर्शनास आल्याचेही उत्तरात नमूद केले आहे. महामार्गाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तीन भुयारी मार्ग व दहा पादचारी पुलांची कामे स्वतंत्रपणे सुरू करण्यात आल्याचेही नमूद केले आहे.
रस्त्याचे काम सुरू असताना नुकत्याच केलेल्या काँक्रीटच्या कामावरून वाहाने गेल्याने काही ठिकाणी खड्डे पडले तसेच टायरचे मार्क आढळून आले. पण त्याची दुरुस्ती पंत्राटदारांमार्फत करण्यात येत असल्याचेही उत्तरात नमूद केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List