मंडणगड तालुक्यात मुसळधार पाऊस ; महत्त्वाचे रस्ते पाण्याखाली, वाहतूक ठप्प

मंडणगड तालुक्यात मुसळधार पाऊस ; महत्त्वाचे रस्ते पाण्याखाली, वाहतूक ठप्प

मंडणगड तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आह. आंबा बागायतदार, बांधकाम व्यावसायिक, मासळी व्यवसाय आदी अनेक व्यवसायांना या अवकाळी पावसाचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. पाऊस सुरू झाल्याने काही शेतकऱ्यांनी रोहिणी नक्षत्राची वाट न पाहता धानाच्या पेरणीला सुरुवात केली. मात्र, पाणथळ शेतीची पेरणी रखडली. त्यातच तरवे भाजणीची कामे झाली नसल्याने शेतकरी मोठया संकटात सापडला होता. पाऊस सुरू झाला या अंदाजाने त्यांनी शेतीची कामे सुरू केली. मात्र आधी धो धो कोसळलेल्या पावसाने नंतर चांगलीच पाठ फिरवली, त्यामुळे शेतीची कामे रखडली. आता पुन्हा 15 जुलै रोजी मंडणगडात मुसळधार पाऊस कोसळल्याने अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे वाहतुकीस मोठा अडसर निर्माण झाला.

मंडणगड तालुक्यातील कुंबळे लाटवण महाड मार्ग हा पाण्याखाली गेल्याने महाड तालुक्याकडे मंडणगड दापोली या तालुक्यातून होणारी सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाली होती. मंडणगड एस. टी. आगाराजवळून जाणाऱ्या भिंगळोली हद्दीतील मार्गावरून मंडणगड शहराकडे जाणाऱ्या वाहतुकीला काही काळ ब्रेक बसला. त्यामुळे वाहतुकीची गती चांगलीच मंदावली. वेरळतर्फे वेसवी येथील शेतीच्या खलाशी पावसाच्या पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात गेल्याने शेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी धास्तावले आहेत. हीच परिस्थिती तिडे तळेघरात काही प्रमाणात होती. दापोली तालूक्यातून पालगड कुंबळे मार्गे मंडणगड येणाऱ्या मार्गावर दापोली हद्दीत विसापूर येथील पुलावर पूराचे पाणी भरल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. कोसळलेल्या पावसाने ग्रामीण भागातील रस्त्यावर दरडी कोसळण्याचे प्रकार ठिकठिकाणच्या गावातील मार्गावर घडले आहेत. मुसळधार पावसाने तालुक्यातील काही गावात विजेचा पुरवठा खंडीत झाला होता. तसेच नेट कनेक्टिव्हिटी यामुळे संपर्क होवू शकत नव्हता. एकुणच काय तर अनेक दिवसाच्या विश्रांती नंतर कोसळलेल्या पावसाने मंडणगडात दाणादाण उडवली आहे. अतिवृष्टीत नेमके किती आणि कोणा कोणाच्या मालमत्तांचे नुकसान झाले आहे. त्याची निश्चित आकडेवारी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळाली नव्हती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बांगलादेश सरकार सत्यजित रे यांचे ढाका येथील वडिलोपार्जित घर पाडणार, केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा; ममता बॅनर्जी यांची मागणी बांगलादेश सरकार सत्यजित रे यांचे ढाका येथील वडिलोपार्जित घर पाडणार, केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा; ममता बॅनर्जी यांची मागणी
बांगलादेशची राजधानी ढाका येथील प्रसिद्ध चित्रपट निर्माते सत्यजित रे यांचे वडिलोपार्जित घर पाडण्यात येत आहे. टेलिग्राफच्या वृत्तानुसार, हे ऐतिहासिक घर...
वॉक केल्यानंतर किती वेळाने पाणी प्यायला हवे,अनेक लोकांना माहिती नाही
Bengluru Rape Case – महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर प्रोफेसरसह दोन मित्रांकडून लैंगिक अत्याचार, आरोपी अटक
जातीच्या विचारांवर चालणारे राजकीय पक्ष देशासाठी धोकादायक; सर्वोच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण मत
Ratnagiri News – कोकणात पावसाचा जोर कायम, राजापूरात नद्यांची पाणी पातळी वाढली
Ratnagiri News – राजापूरमध्ये गोवा बनावटीची लाखो रुपयांची दारू जप्त, एक जण अटकेत
प्रवीण गायकवाड शाईफेकीनंतर सोलापुरात मराठा समाजाची बैठक, दोन गटात राडा