लाडक्या बहिणीचे संसार उध्वस्त करणारे महायुती सरकारचे धोरण, दारु दुकाने परवाने देण्याच्या विरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन
निवडणुकीत राज्याची तिजोरी रिकामी करणाऱ्या सरकारने आता महसूल वाढीसाठी 1972 पासून बंदी असलेले मद्य परवाने देण्यास सुरुवात केली आहे. लाडक्या बहिणींचे संसार उध्वस्त करणाऱ्या या धोरणा विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले.
महायुती सरकारने मद्य परवाने देऊन जनजीवन विस्कळीत करणारे धोरण आखले आहे. सत्ताधारी पक्षांनी आपले हितसंबंध जोपासण्यासाठी राज्यातील लाडक्या बहिणींचे संसार उध्वस्त करत असल्याची गंभीर टीका राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
बाटलीवाल्या सरकारचा धिक्कार असो..दारूवाल्या सरकारचा धिक्कार असो..दारूला प्रोत्साहन देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो..दारूचा व्यवसाय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणाबाजी यावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी दिल्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List