4 अंतराळवीरांसह शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरुप परतले; कॅलिफोर्नियाजवळील समुद्रात लँडिंग

4 अंतराळवीरांसह शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरुप परतले; कॅलिफोर्नियाजवळील समुद्रात लँडिंग

हिंदुस्थानी अंतराळवीर शुभांशू शुक्ला 4 अंतराळवीरांसह पृथ्वीवर सुखरुप परतले आहेत. त्यांचे ड्रॅगन अंतराळयानाने कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर सुखरुप लँडिंग केले आहे. शुभांशू हे सुमारे 18 दिवस अवकाशात होते. या काळात त्यांनी अनेक प्रयोगही केले. शुभांशू शुक्ला हे 25 जून रोजी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून फाल्कन 9 रॉकेटने अंतराळात गेले होते. आता ते सुखरूप पृथ्वीवर परतले आहेत. शुभांशू शुक्ला हे अमेरिका, पोलंड, हंगेरीतील आपल्या 3 सहकारी अंतराळवीरांसह 14 जुलै रोजी दुपारी 4.45 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीकडे निघाले होते. आता हे सर्व अंतराळवीर पृथ्वीवर सुखरुप परतले आहेत.

शुभांशू आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी आणि अंतराळात असताना त्यांच्या शरीरावर झालेल्या परिणामांतून बरे होण्यासाठी 10 दिवस देखरेखीखाली ठेवले जाणार आहेत. शुभांशू शुक्ला हे 1984 नंतर अंतराळात जाणारे हिंदुस्थानचे दुसरे अंतराळवीर आहेत. यापूर्वी राकेश शर्मा यांनी 1984 मध्ये सोव्हिएत युनियनच्या अंतराळयानातून अंतराळात प्रवास केला होता. शुभांशू यांच्या या मोहिमेनंतर हिंदुस्थान आगामी काळात अंतराळ स्थानक स्थापन करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शुभांशू यांची ही मोहीम महत्त्वाची ठरली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

शुभांशू शुक्ला हे हिंदुस्थानी हवाई दलात स्क्वाड्रन कमांडर आहे. त्यांना 2000 तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे. शुभांशू यांनी आपल्या 18 दिवसांच्या अंतराळातील कार्यकाळात 60 हून अधिक प्रयोगांमध्ये भाग घेतला आहे. ज्यात देशाच्या 7 प्रयोगांचा समावेश आहे. शुभांशू यांनी अंतराळात मेथी आणि मूगाचे बीजचा अभ्यास केला. अ‍ॅक्सिओम-4 मोहिमेतील ड्रॅगन अंतराळयान सोमवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीच्या दिशेने निघाले होते. यावेळी शुभांशू शुक्ला यांच्या पालकांनी त्यांच्या सुरक्षित लँडिंगसाठी प्रार्थना केली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;