सेवा बजावतानाच ‘कूपर’ गेला; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, सांगली पोलीस दलात 287 गुन्ह्यांच्या तपासात सहभाग

सेवा बजावतानाच ‘कूपर’ गेला; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, सांगली पोलीस दलात 287 गुन्ह्यांच्या तपासात सहभाग

गेल्या सहा वर्षांपासून सांगली पोलीस दलाचा एक भाग असलेल्या आणि 287 गुन्ह्यांच्या तपासात सहभाग असलेल्या कूपर श्वानाचे निधन झाले. ऑनडय़ुटी असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे निधन झाले. ‘कूपर’ गेला या बातमीने सारे पोलीस दल हळहळले. त्याच्यावर पोलीस मुख्यालयाच्या परिसरात शासकीय इतमामात अंत्यस्कार करण्यात आले. यावेळी त्याचे हॅण्डलर अंमलदार शबाना आतार यांना हुंदका आवरला नाही आणि साऱ्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले.

अत्यंत हुशार, चपळ असा कूपर होता. गुन्हे शोध पथकात त्याचा अग्रक्रमाने सहभाग होता. डॉबरमन प्रजातीच्या या कूपरचा 6 ऑगस्ट 2019 रोजीचा जन्म. गुन्हे शोध पथकात समावेशानंतर त्याला पुण्यात श्वान प्रशिक्षण केंद्रात 10 जानेवारी ते 30 ऑक्टोबर 2020 या कालावधीत प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यानंतर सांगली पोलीस दलात तो दाखल झाला, तेव्हापासून आजपर्यंत तो पोलीस दलाची सेवा देत होता.

कूपरच्या सेवाकाळात त्याला 364 वेळागुन्ह्यांच्या ठिकाणी मागणी आली. त्यापैकी बहुतांशी ठिकाणी त्याला प्रत्यक्ष नेण्यात आले. त्याच्या कामगिरीची दखल घेऊन तत्कालीन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी त्याचा सत्कारही केला होता. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनीही दोन वेळा त्याला गौरविले होते.

सकाळी कूपरला हृदयविकाराचा तीक्र धक्का बसला, यातच त्याचे निधन झाले. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, स्थानिक गुन्हे विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे, कूपरच्या हॅण्डलर शबाना आतार, सुहास भोरे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कूपरला श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर बंदुकीच्या फैरी झाडून पोलीस दलाच्या वतीने अखेरची मानवंदना देण्यात आली. यावेळी कूपरच्या पथकातील कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते.

कूपरची कारकीर्द…

गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत त्याने तब्बल 287 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस दलाला मदत केली होती. 13गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावला होता. 2021 मध्ये जत येथे व 2022 मध्ये हरीपूर (ता. मिरज) येथे अनोळखी व्यक्तींचे खून झाले होते. पोलिसांच्या हाती कोणतेही महत्त्वाचे धागेदोरे नसतानाही ‘कूपर’ने आपल्या क्षमतेच्या जोरावर आरोपींचा माग काढला. त्याने केलेल्या मार्गदर्शनानुसारच पोलीस आरोपींनी जेरबंद करू शकले होते. आटपाडी येथील धाडसी घरफोडीच्या गुह्याच्या तपासातही कूपरने महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2025 या वर्षातही 54गुन्ह्यांच्या तपासात त्याला घटनास्थळी नेण्यात आले होते, त्यापैकी 38गुन्ह्यांत त्याचे दिशादर्शन तपासकामी महत्त्वाचे ठरले.

शबाना यांना कूपरचा लळा

कूपरच्या हॅण्डरल शबाना आतार या अत्यंत भाऊक झाल्या होत्या. अगदी पिल्लू असताना त्यांनी कूपरला ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे कूपर आणि शबाना यांचे वेगळेच नाते होते. त्याचा त्यांना लळा लागला होता. कूपरच्या जेवणापासून सारी काळजी त्या घेत होत्या. त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्यानंतर शबाना यांना अश्रू अनावर झाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उपचारादरम्यान वाघाचा प्राणीरक्षकावर हल्ला उपचारादरम्यान वाघाचा प्राणीरक्षकावर हल्ला
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वैद्यकीय पिंजऱ्यामध्ये उपचार करतेवेळी टी-5 या वाघाने प्राणीरक्षकावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या रक्षकाने...
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात दोघांना जामीन मंजूर, शिलाँग कोर्टाचा निर्णय
Pune News – बारामती पालखी महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू
IND vs ENG 3rd Test – टीम इंडियाची घोडदौड 387 धावांवर थांबली, तिसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त; इंग्लंडने घेतली आघाडी
Baloch Army Attack – बलूच सैन्याच्या हल्ल्यात 50 पाकिस्तानी सैनिक ठार, बीएलएफचा दावा
Jammu Kashmir – एसयूव्ही कार 600 फूट दरीत कोसळली, 5 जणांचा मृत्यू; एक गंभीर जखमी
Ratnagiri News – पळवून लावलं तरी बिबट्या गुरांच्या गोठ्यातच येऊन बसायचा, अखेर वनविभागाने केले जेरबंद