गिरणी कामगारांना मुंबईतच हक्काची घरे द्या, अदानीचे टॉवर शेलू – वांगणीत बांधा! आझाद मैदानात उद्धव ठाकरे कडाडले

गिरणी कामगारांना मुंबईतच हक्काची घरे द्या, अदानीचे टॉवर शेलू – वांगणीत बांधा! आझाद मैदानात उद्धव ठाकरे कडाडले

मुंबईत हक्काचे घर मिळावे यासाठी गिरणी कामगारांच्या 14 संघटनांनी एकत्र येत आज आझाद मैदानावर आंदोलन केले. या आंदोलनाच्या ठिकाणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे यांनी भेट घेत गिरमी कामगारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढला.

”गिरणी कामगरांकडून मला संदेश मिळाला की आज आम्ही सर्व गिरणी कामगार आझाद मैदानावर एकत्र येतोय़, शिवसेनेचा पाठिंबा पाहिजे असं ते म्हणाले. मी त्यांना सांगितले पाठिंबा मागण्याची गरज नाही, शिवसेना तुमच्या सोबत होती व कायम सोबत राहणार आहे. जे सत्ताधारी आता आपल्या उरावर बसले आहेत त्यांना काहीही माहित नाही. त्यांना फक्त मुंबई कशी लुटायची ते माहित आहे, पण मुंबईसाठी रक्त कसं सांडायचं ते माहित नाही. जर या गिरणी कामगारांनी महाराष्ट्राच्या चळवळीत मुंबईसाठी रक्त सांडलं नसतं तर तुमच्या बुडाखालची खुर्ची दिसू शकली नसती. त्यावेळीही या मुंबईवर अधिकार सांगितला जात होता. तेव्हा हा गिरणी कामगार रस्त्यावर उतरला व त्यांनी दिल्लीतील्या सरकारला गुडघ्यावर आणलं आणि आपली मुंबई राखली. त्याच मुंबईमध्ये परत हे दिल्लीच्या मालकाचे नोकर सत्तेवर बसले आहेत. ते गिरणी कामगार व मराठी माणसाला मुबंई बाहेर काढायला बसलेयत. त्यांना माहित आहे जग नाही मिळालं तरी चालेल पण मुंबई पाहिजे. त्यांच्यासाठी मुंबई म्हणजे सोन्याचे अंड देणारी कोंबडी आहे. त्यासाठीच मराठी माणसांमध्ये आपआपसात भांडणं लावायची. मराठी अमराठी भेद करायचा व आपल्या पोळ्या भाजायचा हा त्यांचा डाव आहे. एकदा का हा डाव साधला तर यांच्यासाठी राण मोकळं झालं”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

”ते बोलतायत शिवसेनेने मराठी माणूस मुंबई बाहेर काढला. काळजी करू नका, इथे सगळा मराठी माणूस एकवटला आहे. आता आम्ही तुम्हाला इथेच ठेचणार आहोत, राजकारणात इथेच गाडणार आहोत. धारावीचा जो काही विकास करतायत. त्यांना देखील अपात्र ठरवून बाहेर काढतायत. जसं तुम्ही अडगळीत पडलायत तसंच धारावीकरांना अडगळीत टाकायचंय. धारावीच्या पाचशे एकर जागेसाठी मुंबईची 1600 एकर जागा अदानीच्या घशात टाकलीय. देवनार डंम्पिंग ग्राऊंड, मिठागर, कुर्ला डेअरी सगळं अदानीला दिलंय. आज गिरणी संपाला किती वर्ष झाली लक्षात देखील नाही. गिरणी कामगारांची दुसरी तिसरी पिढी आहे. त्या काळात संप झाला. गिरणी कामगारांना उद्धव्स्त केलं. सगळ्या जमिनी घशात टाकून त्यावर टॉवर उभे केले. सोन्यासारखी जागा गिरणी मालकाच्या घशात टाकल्या. ज्यांनी आपल्याला मुंबई मिळवून दिली त्यांना शेलू आणि वांगणीला टाकतायत. आमची अशी ठाम मागणी आहे की गिरणी कामगारांना धारावी, कुर्ल्यात हक्काची घरं द्या व अदानीचे टॉवर शेलू वांगणीला बांधा. देवनार डम्पिंगवर अदानीचे टॉवर होऊ द्या. पण माझ्या गिरणी कामगार, सफाई कर्मचारी, पोलिसांना धारावीत घरं द्या. ज्यांच्यावर मुंबई आहे त्यांना इथे हक्काची घरं मिळालीच पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कंत्राटदारांना द्यायला तुमच्याकडे 80 हजार कोटी रुपये तुमच्याकडे नसतील तर राज्य तुम्ही डबघाईला आणलंय – संजय राऊत कंत्राटदारांना द्यायला तुमच्याकडे 80 हजार कोटी रुपये तुमच्याकडे नसतील तर राज्य तुम्ही डबघाईला आणलंय – संजय राऊत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचं स्मशान केलं आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी...
दररोज 7 हजार पावलं चालल्याने नैराश्य आणि स्मृतिभ्रंश सारख्या आजारांचा धोका कमी होतो, वाचा
2006 Mumbai train blasts – हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, सुटका झालेले 11 आरोपी पुन्हा तुरुंगात जाणार?
आत्महत्या नाही, सरकारी अनास्थेने केलेला खून; अंबादास दानवे यांचा सरकारवर हल्लाबोल
हर्षल पाटीलनंतर आता पुढचा नंबर माझा! ‘तो’ मेसेज वाचून जितेंद्र आव्हाड यांच्या पायाखालची जमीन सरकली
Shravan Special – उपवासाला राजगिरा खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे
शिर्डीतील साई मंदिरात बॉम्ब ठेवलाय; भाविक आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ बाहेर काढा, धमकीचा मेल येताच सुरक्षा यंत्रणा अलर्ट